शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी बँकांचे खासगीकरण अमान्य- प्रभू

By admin | Updated: December 13, 2015 01:02 IST

सहकारी बँकांनी खासगी क्षेत्रातील संस्थांबरोबर जरूर काम करावे, पण या बँकांचे खासगीकरण करणे योग्य नाही. सध्या खासगीकरणाची चर्चा सुरू आहे, पण त्याला विरोध केला पाहिजे.

सोलापूर : सहकारी बँकांनी खासगी क्षेत्रातील संस्थांबरोबर जरूर काम करावे, पण या बँकांचे खासगीकरण करणे योग्य नाही. सध्या खासगीकरणाची चर्चा सुरू आहे, पण त्याला विरोध केला पाहिजे. सरकारनेही सहकार क्षेत्राच्या विकासासाठी धोरण आखले पाहिजे, असे स्पष्ट मत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी व्यक्त केले.सोलापूर जनता बँकेने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या सहकार परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यास प्रभू यांनी नवी दिल्लीहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांच्या भारतदौऱ्यामुळे ते या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहू शकले नाहीत. सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांच्या हस्ते सहकार परिषदेचे उद्घाटन झाले. सुरेश प्रभू म्हणाले की, भारताच्या नवनिर्मिती अर्थात भारत निर्माण महायज्ञ सहकार क्षेत्राच्या सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. सहकार क्षेत्र जगले, वाढले पाहिजे, यासाठी करप्रणाली निश्चित करताना आणि कायदे करताना सरकारने योग्य धोरणे आखावित. याचबरोबर सहकार क्षेत्रानेही आपल्यातील वैगुण्य दूर करून प्रगतीचा मार्ग अवलंबिला पाहिजे.