शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

राज्यातील ग्रामसेवकांचे ७ नोव्हेंबर पासून असहकार

By admin | Updated: October 17, 2016 19:50 IST

ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या त्वरीत मान्य कराव्या, यासाठी राज्यातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी ७ नोव्हेंबर पासून प्रशासनासोबत असहकार आंदोलन पुकारणार आहेत.

ऑनलाइन लोकमतबुलडाणा, दि. १७: ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या त्वरीत मान्य कराव्या, यासाठी राज्यातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी ७ नोव्हेंबर पासून प्रशासनासोबत असहकार आंदोलन पुकारणार आहेत. दरम्यान असहकार आंदोलनाच्या कालावधीत वरिष्ठ कार्यालयांच्या सभांवर बहिष्कार टाकण्यासोबतच कोणत्याही अधिकाऱ्याला दफ्तर तपासणी करु न देण्याचा निर्णय ग्रामसेवक संघटनेने घेतला आहे.

ग्रामसेवकांचा सेवाकाळ तीन वर्षाचा गृहीत धरणे, तीन हजार लोकसंख्येला ग्रामविकास अधिकारी सांझा निर्मीती करणे, विस्तार अधिकारी पदांची वाढ करणे व ती पदे पदोन्नतीने भरणे, डीसीपीएस यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, २६ जानेवारी आणि १५ आॅगस्टला ग्रामसभा न घेणे यासह विविध १७ मागण्यांसाठी राज्यात हे आंदोलन पुकारल्या जाणार आहे.

राज्यातील सर्व पंचायत समितीसमोर ७ नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन पुकारण्यात येणार आहे. ११ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन व १५ नोव्हेंबर सर्व विभागीय आयुक्त कार्यालयावर धरणे दिल्या जाणार आहेत. १७ नोव्हेंबर पासून सर्व ग्रामपंचायतीच्या चाव्या आणि शिक्के गटविकास अधिकाऱ्यांकडे देण्याचा निर्णय ग्रामसेवक संघटनेने घेतला आहे.