शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

महामंडळांच्या ठेवींवर डल्ला !

By admin | Updated: January 12, 2016 04:39 IST

राज्य शासनाची विविध महामंडळे आणि प्राधिकरणांच्या जवळपास ३५० कोटी रुपयांच्या देना बँकेतील मुदत ठेवींवर बोगस पावत्या बनवून कोट्यवधी रुपयांचे कॅश क्रेडिट देण्याचे प्रकार घडले आहेत.

- यदु जोशी,  मुंबई

राज्य शासनाची विविध महामंडळे आणि प्राधिकरणांच्या जवळपास ३५० कोटी रुपयांच्या देना बँकेतील मुदत ठेवींवर बोगस पावत्या बनवून कोट्यवधी रुपयांचे कॅश क्रेडिट देण्याचे प्रकार घडले आहेत. बँकेचे अधिकारी आणि दलालांच्या संगनमतातून हे धक्कादायक प्रकार घडले आहेत. या महाघोटाळ्यात एमएमआरडीए, महिला आर्थिक विकास मंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मकार विकास महामंडळ (लिडकॉम) व पर्यटन विकास महामंडळासह किमान १० महामंडळांना गंडविण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मलबार हिलमधील देना बँकेच्या शाखेत हे प्रकार २०१४ आणि २०१५ मध्ये घडले. या प्रकरणी आलेल्या तक्रारी आणि संबंधित माहिती आम्ही सीबीआयच्या स्वाधीन केली आहे, असे मलबार हिल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र काळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देना बँकेने या महामंडळांकडून दलालांमार्फत मुदत ठेवी स्वीकारल्या आणि त्याच्या बोगस पावत्या (एफडीआर) संबंधित महामंडळांना दिल्या. इकडे मूळ मुदत ठेवी (एफडी) मात्र भलत्याच व्यक्ती वा कंपन्यांच्या नावाने बनविण्यात आल्या आणि त्यावर त्यांना कोट्यवधी रुपयांचे कॅश क्रेडिट देण्यात आले. अशा प्रकारे महामंडळांच्या ठेवींवर खासगी व्यक्तींना मोठा आर्थिक लाभ देण्यात आला. बहुतेक मुदत ठेवी त्यावरील व्याज रकमेसह पुन्हा गुंतविल्याने फसवणुकीचा गोरखधंदा बिनदिक्कत सुरू राहिला.मुंबईत दलालांचे मोठे रॅकेट कार्यरत...महामंडळे/प्राधिकरणांकडून मुदत ठेवी बँकांना मिळवून द्यायच्या; बँकेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने बोगस पावत्या बनवायच्या आणि मूळ मुदत ठेवी पावत्यांवर भलत्यांनाच फायदा मिळवून द्यायचा, असे दलालांचे मोठे रॅकेट मुंबईत कार्यरत असल्याची बाब तपासात समोर आली आहे. या प्रकरणी काही गुन्हे दाखल झाले, पण प्रकरण दाबले जात असल्याची जोरदार चर्चा आहे. महामंडळांकडून गुंतविण्यासाठी पैसा नेणाऱ्या दलालांचे व महामंडळांच्या अधिकाऱ्यांचे काय संबंध होते, त्यांनी पावत्या दलालांमार्फत स्वीकारल्या का, याची चौकशी झाल्यास अनेक अधिकारीही अडचणीत येऊ शकतात.काही महामंडळांनी एफडींची मुदत संपल्यानंतर देना बँकेकडे व्याजासह रक्कम परत मागितली. परंतु बँकेकडून वारंवार टाळाटाळ केली गेल्याने संशय बळावला. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी खोलात जाऊन चौकशी केली असता महामंडळाला देण्यात आलेल्या एफडीच्या पावत्याच बोगस असल्याचे त्यांच्या लक्षात आले. १० ते ६० कोटींपर्यंतच्या रकमा यात गुंतविण्यात आल्या आहेत.एमएमआरडीएने देना बँकेत रक्कम गुंतविली. आमच्या ठेवी सुरक्षित असल्याचे बँकेने आम्हाला कळविले आहे. या एफडींच्या आधारे कोणाला आर्थिक फायदा मिळवून देण्यात आला किंवा नाही, ही बाब एमएमआरडीएच्या अखत्यारीत येत नाही, असे एमएमआरडीएचे सहप्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी सांगितले.