शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीचा फटका : ‘गुलशनाबाद’च्या गुलाबाची परदेशवारी हुकली

By admin | Updated: February 13, 2017 22:11 IST

‘व्हॅलेंटाइन डे’च्या औचित्यावर भारतीय बाजारपेठेचा आधार

अझहर शेख / नाशिक : गुलशनाबाद ही नाशिकची जुनी ओळख. येथील ‘रेड रोझ’ बघताच तरुणाईच्या मुखातून ‘वॉव’ असा शब्द बाहेर पडल्यास आश्चर्य वाटू नये. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या औचित्यावर नाशिकमधील गुलाब उत्पादकांनी घेतलेल्या उत्पादनाला यंदा नोटाबंदीचा फटका बसला आहे. परदेशात गुलाबाची निर्यात करणाऱ्या कंपन्या शेतकऱ्यांच्या बांधावर अपवादानेच पोहचल्याने गुलशनाबादच्या गुलाबाची परदेशवारी हुकली.शहरातील जानोरी, मोहाडी, गंगापूर, गोवर्धन, गिरणारे, मखमलाबाद या भागांमध्ये गुलाबाची शेती मोठ्या प्रमाणात आहे. जानारी हे निर्यातक्षम गुलाबाचे उत्पादन घेणारे माहेरघर म्हणून ओळखले जाते. यावेळी गुलाबाचे उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले; मात्र मालाला हमीभाव व योग्य बाजारपेठ उपलब्ध होऊ शकली नाही. नोटाबंदीच्या काळात शेतकऱ्यांना गुलाब फुलविण्यासाठी लागणारी विविध रासायनिक औषधे वेळेवर खरेदी करता आली नाही. तरीदेखील आंम्ही उच्च दर्जाचा निर्यातक्षम गुलाब क ष्टाने फुलविला; मात्र गुलाबाला परदेशी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकली नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. बोर्डेक्स, टॉप सिक्रेट प्रजातीच्या ‘रेड रोझ’चे दोन एकरावर उत्पादन यावर्षी मोठ्या कष्टाने घेतले. नोटाबंदीमुळे निर्यात करणाऱ्या कंपन्यांसोबत रोखीचा व्यवहार होऊ शकला नाही. यामुळे नवी दिल्ली, मुंबईच्या बाजारपेठेचा आधार नाशिकच्या शेतकऱ्यांना लाभला आहे.