शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

महिलांवरील अत्याचाराच्या आढाव्यासाठी ‘नोडल एजन्सी’

By admin | Updated: May 28, 2016 01:35 IST

राज्यातील तरुणी व महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा आलेख वाढत असताना त्याला प्रतिबंधासाठी केल्या जाणाऱ्या कार्यवाहीचा लेखाजोखा आता दस्तरखुद्द गृह विभागाच्या

- जमीर काझी, मुंबई

राज्यातील तरुणी व महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा आलेख वाढत असताना त्याला प्रतिबंधासाठी केल्या जाणाऱ्या कार्यवाहीचा लेखाजोखा आता दस्तरखुद्द गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडून घेतला जाणार आहे. महिलांवरील गुन्हे व समस्यांच्या निराकरणाची माहिती घेण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली संपर्क यंत्रणेची(नोडल एजन्सी) राज्य सरकारने स्थापना केली आहे. दहा सदस्यांच्या समितीमध्ये विविध विभागांचे प्रधान सचिव व आयपीएस अधिकाऱ्यांच्या समावेश असणार असून, दर तीन महिन्यांनी या समितीची बैठक घेऊन आढावा घेतला जाणार आहे. त्यांची माहिती उच्च न्यायालयालाही कळवावी लागणार आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यभरात महिला व तरुणींवर अत्याचार, हल्ल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्याबाबत सर्व स्तरावर होत असलेल्या टीकेमुळे पाच वर्षांपूर्वी कॉँग्रेस आघाडी सरकारने महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी माजी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समितीची स्थापना केली होती. या समितीने शिफारशी सुचवून विविध विभागांमार्फत अंमलबजावणी करण्याची सूचना केली होती. त्याबाबत शासनाकडून टप्प्याटप्प्याने कार्यवाही केली जात आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी गृह विभागाकडून एक स्वतंत्र ‘नोडल एजन्सी’ नेमण्याची शिफारस करण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी करण्यास गृह विभागाने नुकताच हिरवा कंदील दाखविला आहे. गृह विभागाचे अपर मुख्य सचिव के.पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखालील समितीची स्थापना केली आहे. महिला अत्याचार प्रतिबंध व सायबर गुन्हे विभागाचे विशेष महानिरीक्षक ब्रिजेश सिंह त्यांचे सदस्य सचिव असतील. त्याशिवाय महिला व बालकल्याण, विधि व न्याय, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य, सार्वजनिक आरोग्य, गृह विभागाचे प्रधान सचिव आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य शाखेचे सरकारी अभियोक्ता तसेच महिलांशी संबंधित क्षेत्रात कार्य करणाऱ्या दोन महिलांचा सदस्य म्हणून समावेश असणार आहे. दर तीन महिन्यांतून एकदा ‘नोडल एजन्सी’कडून बैठक घेऊन राज्यातील महिलांवरील अत्याचार, समस्या आणि त्याबाबत केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला जाईल, त्याची माहिती उच्च न्यायालयाला सादर करावी लागणार असल्याचे गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना, कार्यवाहीची माहिती ‘नोडल एजन्सी’कडून घेऊन त्याबाबत योग्य त्या सूचना केल्या जातील. त्याची कार्यवाही करणे अधिकाऱ्यांवर बंधनकारक असणार आहे. - के.पी. बक्षी (अपर मुख्य सचिव, गृह)