शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

यापुढे युती नाही!

By admin | Updated: February 5, 2017 00:44 IST

केवळ पोकळ आश्वासने आणि फुकटचे श्रेय घेणाऱ्यांच्या साथीतून आता आपण बाहेर पडलो आहे. पुन्हा युतीच्या राजकारणात पडायचे नसून ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे

मुंबई : केवळ पोकळ आश्वासने आणि फुकटचे श्रेय घेणाऱ्यांच्या साथीतून आता आपण बाहेर पडलो आहे. पुन्हा युतीच्या राजकारणात पडायचे नसून ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे, त्यामुळे सेना संपवू म्हणविणाऱ्यांना कायमचे हद्दपार करीत मुंबई महापालिकेवर एकट्याने भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे, असे आवाहन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केले. गिरगावातील चिराबाझार येथील सभेने सेनेच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी उद्धव यांनी पंतप्रधान मोदी, भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासह केंद्र कारभारावर कडाडून हल्ला चढविला. केंद्रीय अर्थमंत्रालयाने मुंबई महापालिकेचा कारभार सर्वाधिक पारदर्शी असल्याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे,त्यामुळे आमच्या कारभारावर टीका करणारे तोंडावर आपटले आहेत, असा टोला मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे नाव न घेता हाणला. ते म्हणाले,‘ महाराष्टा्रमध्ये गेल्यावर्षी दुष्काळ होता. मात्र केंद्राकडून पुरेशी मदत झाली नाही. आता यंदा चांगला पाऊस झाला तर यांनी नोटबंदी आणून सर्वसामान्य, शेतकऱ्यांचे आयुष्य अडचणीत आणले. भाजपाने उत्तर प्रदेशमध्ये वचननाम्यात पीककर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले आहे. मग माझ्या राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज का माफ नाही केले? तुमची सत्ता आहे ना, तर मग का नाही निर्णय घेत? असा सवाल करीत उद्धव म्हणाले, निवडणूका जिंकण्यासाठी खोटी आश्वासने द्यावयाची ही त्यांची पद्धत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात आमच्यात मनभेद आहेत. माझे त्यांना खुले आवाहन आहे की, मनभेद की मतभेद ते समोरासमोर येऊन लोकांना सांगा. अमित शहा तुम्ही हिंदुत्व सोडलंत, राष्ट्रीयत्व सोडले. पण आम्ही सोडणार नाही. म्हणून आमचे मतभेद आहेत. कधी म्हणतात फ्रेंडली, तर कधी महाभारतातील कौरव पांडवाची लढाई आहे, असे म्हणतात. महाभारत खेळायचे असल्यास पहिल्याद श्रीखंडी, पाखंडी ही पात्रे समोर येऊ देत मग त्यांना हिसका दाखवू.’ (प्रतिनिधी)निर्णय का नाही?महाराष्टा्रमध्ये गेल्यावर्षी दुष्काळ होता. मात्र केंद्राकडून पुरेशी मदत झाली नाही. आता यंदा चांगला पाऊस झाला तर यांनी नोटबंदी आणून सर्वसामान्य, शेतकऱ्यांचे आयुष्य अडचणीत आणले. भाजपाने उत्तर प्रदेशमध्ये वचननाम्यात पीककर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले आहे. मग माझ्या राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज का माफ नाही केले? तुमची सत्ता आहे ना, तर मग का नाही निर्णय घेत? असा सवाल करीत उद्धव म्हणाले, निवडणूका जिंकण्यासाठी खोटी आश्वासने द्यावयाची ही त्यांची पद्धत आहे.