शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

विवाह करून गुन्हा रद्द होत नाही - हायकोर्ट

By admin | Updated: May 1, 2016 02:01 IST

अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार करून तिच्या घरच्यांपुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवून आरोपी गुन्ह्यातून सुटका करून घेऊ शकत नाही. हा समाजाविरुद्ध केलेला गुन्हा आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने

मुंबई : अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार करून तिच्या घरच्यांपुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवून आरोपी गुन्ह्यातून सुटका करून घेऊ शकत नाही. हा समाजाविरुद्ध केलेला गुन्हा आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने बलात्कार प्रकरणातील आरोपीवरील गुन्हा रद्द करण्यास नकार दिला.कोल्हापूरमधील एका अल्पवयीन गतिमंद मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्याने टिपू शिकलगार याला फेब्रुवारी २०१६ मध्ये अटक करून बलात्कार केल्याचा गुन्हा नोंदवला.संबंधित मुलगी माझी सख्खी चुलत बहीण असून तिच्याशी माझा विवाह लावून देण्यास दोन्ही कुटुंबीयांची संमती आहे. त्यामुळे माझ्यावरील गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी याचिका टिपू याने उच्च न्यायालयात अ‍ॅड. विजय किल्लेदार यांच्याद्वारे दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे होती. पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार, टिपूने अल्पवयीन गतिमंद सख्ख्या चुलत बहिणीवर बलात्कार केला. ती आठ आठवड्यांची गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर तिच्या आईने अज्ञात लोकांविरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. बलात्कार करणारा तिचा चुलत भाऊच असल्याचे उघडकीस आले. याचिकेनुसार, टिपूचे आणि पीडितेचे कुटुंबीय विवाह लावून देण्यास तयार झाले आहेत. आमच्या समाजात सख्खी चुलत भावंडे विवाह करू शकतात. त्यामुळे पोलिसांना गुन्हा रद्द करण्याचा आदेश द्यावा व जोपर्यंत सुनावणी प्रलंबित आहे तोपर्यंत जामिनावर सुटका करावी व पीडितेशी विवाह करण्याची परवानगी द्यावी. मात्र न्यायालयाने आरोपीचे म्हणणे फेटाळले. आरोपीने गुन्हा केला तेव्हा पीडित मुलगी अल्पवयीन होती. गुन्हा नोंदवला तेव्हा ती सज्ञान होती, अशी आरोपीची भूमिकाही न्यायालयाने फेटाळली. (प्रतिनिधी) समाजाविरुद्ध गुन्हाबलात्कार केल्यानंतर गुन्हा रद्द करण्यासाठी पीडितेशी विवाह करण्याचा प्रस्ताव आरोपीने ठेवला तरी त्याच्यावरील गुन्हा रद्द होऊ शकत नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने एका केसमध्ये दिला आहे. त्याचाच आधार घेत उच्च न्यायालयानेही हा समाजाविरुद्ध गुन्हा आहे. अशा गंभीर प्रकरणात आम्ही आरोपीवरील गुन्हा रद्द करू शकत नाही, असे स्पष्ट केले. पीडित गतिमंद असल्याने ती विवाहास परवानगी देऊ शकत नाही. त्यामुळे तिच्याशी विवाह करण्याची संमती मिळू शकत नाही. अशा केसेसमध्ये गुन्हा रद्द केला जाऊ शकत नाही. सीआरपीसी कलम ४८२ अंतर्गत गुन्हा रद्द करण्यास ही योग्य केस नाही