शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

कोपर्डी प्रकरणाला जातीय रंग नको : प्रकाश आंबेडकर

By admin | Updated: July 22, 2016 01:00 IST

कोपर्डी प्रकरणातील गुन्हा अत्यंत निषेधार्ह आहे, दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, मात्र त्यावरून जातीय तणाव निर्माण करणे

पुणे : कोपर्डी प्रकरणातील गुन्हा अत्यंत निषेधार्ह आहे, दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, मात्र त्यावरून जातीय तणाव निर्माण करणे, विशिष्ट जातीवर टीका करणे योग्य नाही. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने याबाबत भाष्य करणे गरजेचे आहे, असे मत भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.कोपर्डी (ता. कर्जत) येथील पीडित मुलीच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी आंबेडकर निघाले होते. मात्र शिरूर येथे ते पोहोचले असतानाच नगर पोलिसांनी मनाई करणारा हुकूम बजावला. त्याचे कारण विचारले असता पोलिसांनी तुमच्या भेटीला विरोध करण्याचा निर्णय कोपर्डी गावात झाला असल्याची माहिती त्यांना दिली. त्यामुळे पुण्यात येऊन आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘कोपर्डी प्रकरणाला जातीय रंग देणे योग्य नाही. सोशल मीडियावरून वारंवार तसे केले जात आहे. पीडित कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठीच आपण तिथे जात होतो, मात्र पोलिसांनी मनाई केली. आंबेडकर म्हणाले, ‘‘भाजपाच्या पदाधिकाऱ्याने उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांच्याविषयी काढलेले उद््गार हा भाजपाच्या धोरणाचाच एक भाग आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशावरून कोणी कोणाविरुद्ध बोलायचे हे निश्चित केले जात असून, त्यानुसारच हे सुरू आहे. असे कोणी कोणाविरुद्ध बोलायचे हे त्यांच्यात ठरले असल्याचे दिसते आहे. गुजरातमध्ये दलितांवर अत्याचार झाले. तिथे असलेल्या गोरक्षा समितीला संघाचे पाठबळ आहे. मायावतींवर झालेली टीकाही त्यांच्या धोरणाचाच भाग असावा. ’’