शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नितीन आंबुर्ले यांचे नामनिर्देशनपत्र वैध

By admin | Updated: November 4, 2016 02:49 IST

मुरुड-जंजिरा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०१६ याकरिता प्रभाग क्र मांक ८ मधून निवडणूक होत आहे.

आगरदांडा/ मुरुड : मुरुड-जंजिरा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०१६ याकरिता प्रभाग क्र मांक ८ मधून निवडणूक होत आहे. याकरिता नगराध्यक्षासह ७३ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. यांची छाननी बुधवारी नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात झाली, रात्री उशिरापर्यंत काम सुरू होते. अपक्ष उमेदवार नितीन आंबुर्ले यांचे नामनिर्देशनपत्र दिवसभराच्या आक्षेपानंतर रात्री वैध ठरविण्यात आले.प्रभाग क्र मांक ६ (ब) सर्वसाधारणमधील प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी सुरू असताना नामनिर्देशनपत्र अ.क्र . ६८वरील अपक्ष उमेदवार नितीन आंबुर्ले यांचे नामनिर्देशनपत्र छाननीसाठी घेतले असता त्याच भागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विश्वनाथ रणदिवे यांनी लेखी आक्षेप नोंदवला. नितीन आंबुर्ले यांच्या नामनिर्देशनपत्रातील पाच सूचकांपैकी सूचक क्र .१ रवींद्र कारेकर यांची स्वाक्षरी ही बनावट आहे. त्यामुळे त्यांचे नामनिर्देशनपत्र फेटाळण्यात यावे अशी लेखी मागणी केली त्यानंतर नितीन आंबुर्ले यांनी माझ्या नामनिर्देशनपत्रावर सूचक म्हणून रवींद्र यांची स्वाक्षरी आहे असे सांगितले. बुधवारी सायंकाळी ५ वाजता रवींद्र कारेकर ,नितीन आंबुर्ले, विश्वनाथ रणदिवे सभागृहात हजर राहिले. निवडणूक निर्णय अधिकारी वानखेडे यांनी रवींद्र कारेकर यांना नितीन नामदेव आंबुर्ले यांच्या नामनिर्देशनपत्रावर सूचक म्हणून तुमची स्वाक्षरी आहे का याबाबत रवींद्र कारेकर यांना विचारणा के ली. त्यांनी आंबुर्ले यांच्या नामनिर्देशनपत्रावर केलेली स्वाक्षरी माझीच आहे असे सत्यप्रतिज्ञेवर सांगितले आहे. त्यानुसार रवींद्र कारेकर यांचे म्हणणे ग्राह्य धरु न नितीन आंबुर्ले यांचे प्रभाग क्र मांक ६(ब) सर्वसाधारण या जागेकरिताचे नामनिर्देशनपत्र वैध ठरविण्यात आले आहे . मुरुड -जंजिरा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी ७३ जणांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. छाननीत ९ नामनिर्देशनपत्र नगरसेवकांसाठी आलेले उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले, तर नगराध्यक्षपदासाठी २ नामनिर्देशनपत्र अवैध ठरविण्यात आले. छाननी प्रक्रिया संपन्न झाली असली तरी खऱ्या अर्थाने आजपासून ते ११ नोव्हेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र कोणते उमेदवार मागे घेतात त्यावरु न आखाड्यातील खरे प्रतिस्पर्धी समजणार आहेत. गुरुवारी एकाही उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही.(वार्ताहर)