शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

निर्मलग्राम पुरस्कार योजना खंडीत !

By admin | Updated: November 10, 2015 23:36 IST

पाणी पुरवठा विभागाचे आदेश;जिल्हा परिषदेच्या स्वच्छता अभियानाला फटका बसणार.

राजेश शेगोकार / बुलडाणा : ग्राम स्वच्छतेबाबत ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धा निर्माण करणारी निर्मल ग्राम पुरस्कार योजना खंडीत करण्याचे आदेश राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने ६ नोव्हेंबर रोजी दिले आहेत. केंद्र शासनाच्या सहकार्याने राज्य शासनाने सन २00३ पासून राज्यात निर्मल ग्राम योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गंत गावागावात शौचालय बांधकामाची चळवळ सुरू करण्यात आली. अनेक ग्रामपंचायतींनी निर्मल ग्राम योजनेत सहभाग घेवून गाव हागणदरी मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला होता. आपले गाव निर्मल व्हावे म्हणून गावांमध्ये स्पर्धा सुरू होती. अनेक ग्रामपंचायतींनी पुरस्कारही पटकावले होते. शासनाच्या आदेशाने आता हागणदारी मुक्तीची स्पर्धाच संपुष्टात येणार आहे. या संदर्भात पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग सांभाळणारे बुलडाणा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी यादव यांना विचारले असता अशा आशयाचे पत्र आल्याच्या माहीतीला दुजोरा दिला. २00५ ते २0१५ पर्यंत एकूण ६४ ग्रामपंचायतींना निर्मलग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी पुरस्कार प्राप्त गावाच्या विकासासाठी अतिरिक्त निधी देण्यात आला. या निधीमधून विकासाची कामे झाली. मात्र, पाणी पुरवठा विभागाच्या संचालकांनी ६ नोव्हेंबरच्या पत्राद्वारे केंद्र शासनानेही ही योजना खंडीत करीत असल्याचे सर्व जिल्हा परिषदांना सूचीत केले आहे. या आदेशामुळे जिल्हा परिषदांच्या स्वच्छता कार्यक्रमांना फटका बसणार आहे. सपूर्ण स्वच्छता अभियान व निर्मल भारत अभियानांतर्गत ग्रामंपचायतीमध्ये स्वच्छतेचे सातत्य राखण्यासाठी व स्वच्छतेबाबत लोकचळवळ निर्माण करण्यासाठी निर्मल ग्राम पुरस्काराचे सन २00३ पासून मोठे योगदान होते. केंद्र शासनाच्यावतीने दिला जाणारा हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जात होता.