शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

नऊ बालमजुरांना दोन महिने ठेवले होते डांबून

By admin | Updated: July 1, 2016 02:46 IST

कुरार परिसरातून सुटका झालेल्या ओडिशाच्या ९ बालमजुरांना दोन महिने खोलीत डांबून ठेवले असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

मुंबई : कुरार परिसरातून सुटका झालेल्या ओडिशाच्या ९ बालमजुरांना दोन महिने खोलीत डांबून ठेवले असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या मुलांना १२ ते १३ तास राबवून घेतले जाई. त्यांना मोबदला देणे दूरच दोन वेळचे जेवणही वेळेवर दिले जात नसल्याची माहिती मुलांनी दिली आहे. मूळचे ओडिशा येथील रहिवासी असलेल्या या मुलांचे ९ एप्रिल रोजी अपहरण करण्यात आले. कोलकाता परिसरात ४ दिवसांचे काम असल्याचे सांगून या मुलांना नेण्यात आले होते. जास्तीच्या पैशांच्या आमिषाने ही मुले निघून गेली. त्यानंतर कोलकातामार्गे या मुलांना मुंबईतील कारखान्यात नेण्यात आले. आपण मुंबईला केव्हा पोहोचलो हे या चिमुकल्यांना उमगलेच नाही. यामध्ये १३ ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांचा समावेश आहे. मालाडच्या आप्पापाडा परिसरात असलेल्या दिवकृपा सोसायटीमधील खोलीत ही मुले राहत होती. मुंबईतील जापू शाखेचे एपीआय सुरेश शिंदे आणि तुकाराम जगताप यांच्या पथकाने छापा टाकून त्यांची सुटका केली. चौकशीत तब्बल दोन महिने या मुलांना खोलीतच डांबून ठेवण्यात आले होते. घरमालक बाहेर जाताना कुलूप लावून जात असे. तब्बल १२ ते १३ तास या मुलांकडून काम करून घेतले जाई. एक वेळ वडापाव खाऊन ही मुले गुजराण करत. अनेकदा या मुलांनी घरी जाण्यास हट्ट केला. पर्यायी मालकाचा मार त्यांच्या पदरी पडला. त्यांना डोंगरी येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहेत. ओडिशा पोलिसांकडून त्यांचे जबाब नोंदविण्यात येत आहेत. या प्रकरणी कारखाना चालक, त्याचा पार्टनर आणि दोन पर्यवेक्षकांना अटक करण्यात आली होती. संदीप निर्मल जाना (२८), जयप्रकाश तिलकधारी यादव (३५), विभास गुणेधर सामंत (२५) आणि मानस नंदन पाया (२६) अशी अटक आरोपींची नावे आहेत. (प्रतिनिधी)