शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

लातुरमध्ये देशमुखविरुद्ध निलंगेकर लढाई

By admin | Updated: January 20, 2017 00:09 IST

लातूर जिल्ह्यात राजकीय पक्षांची आघाडी वा युती झाली अथवा नाही झाली तरी खरी लढाई देशमुखविरुद्ध निलंगेकर अशीच राहाणार आहे.

दत्ता थोरे,

लातूर- लातूर जिल्ह्यात राजकीय पक्षांची आघाडी वा युती झाली अथवा नाही झाली तरी खरी लढाई देशमुखविरुद्ध निलंगेकर अशीच राहाणार आहे. विलासरावांचे धोरले चिरंजीव अमित देशमुख यांच्या पाठोपाठ आता धाकटे चिरंजीव धीरज यांचेही राजकारणात पदार्पण होऊ घातले असून त्यांच्या ‘लाँचिंग’साठी काका दिलीपराव देशमुख यांनी मोर्चेबांधणी केली आहे,जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे खुल्या गटाला असल्याने धीरज देशमुख यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे. मात्र, त्यांना रोखण्यासाठी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने तगडे आव्हान उभे केले आहे. १९८२ साली लातूर जिल्हा परिषदेची स्थापना झाली. माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख हे पहिले अध्यक्ष. तेव्हापासून आजतागायत जिल्हा परिषदेवर काँग्रेसचेच वर्चस्व राहिले. शिवाय, देशमुखांच्या गढीवरच जि. प. च्या किल्ल्या कायम राहिल्या. सध्या काँग्रेसकडे ३५ जागा आहेत, तर भाजपाकडे आठ, राष्ट्रवादीचे नऊ तर सेनेचे पाच सदस्य आहेत. सेनेला जिल्ह्यात चेहरा नाही. तर राष्ट्रवादी ‘गट’बंबाळ झालीय. त्यामुळे झुंज होईल ती काँग्रेस विरुध्द भाजपातच. नगरपरिषद निवडणुकांमध्ये काँग्रेसला सर्व ठिकाणी सत्तेच्या भरल्या पंक्तीतून उठावे लागले. आधी लोकसभा, नंतर विधानसभा, नगरपंचायत आणि आता नगरपरिषद या सर्वच ठिकाणांहून जिल्ह्यात काँग्रेसला कुठेही समाधानकारक यश मिळाले नाही. बालेकिल्ल्यात चोहोबाजूंनी अशा पडझडीच्या मौसमात जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. लातूर (१०), औसा (९), निलंगा (९), उदगीर (७), आणि अहमदपूर (६) या पाच तालुक्यात ४१ जागा आहेत. पैकी उदगीरसह जळकोटवर भाजपाचे आमदार सुधाकर भालेराव, अमहदपूरमध्ये नुकतेच भाजपात आलेले आमदार विनायक पाटील तर देवणी, शिरुरअनंतपाळ आणि निलंग्यावर खुद्द संभाजीराव पाटील यांचे वर्चस्व आहे. तर काँग्रेसकडे अमित देशमुख (लातूर) , त्र्यंबक भिसे (लातूर ग्रामीण) व बस्वराज पाटील (औसा) असे राजकीय पाठबळ आहे. शिवाय, या निवडणुकीची सर्व सुत्रे दिलीपराव देशमुख यांनी हाती घेतल्याने त्यांचे ‘मॅनेजमेन्ट’ कौशल्य पणाला लागले आहे. या जिल्ह्याने पूर्वी विलासरावविरुद्ध शिवाजीराव पाटील निलंगेकर असा राजकीय संघर्ष पाहिला आहे. कालांतराने दोन्ही गटात समेट घडून विलासराव व निलंगेकर एकत्र आले. आता दुसऱ्यापिढीत पुन्हा हा संघर्ष उभा ठाकला आहे. विलासरावांचे चिरंजीव धीरज देशमुख यांची जिल्हा परिषदेत एन्ट्री रोखण्यासाठी संभाजीराव निलंगेकर यांनी कंबर कसली आहे.सुरुवातीला अध्यक्षपद हे महिलेला राखीव होते. परंतु नव्याने झालेल्या सोडतीत ते खुुल्या गटाला आले. या अदलाबदलीत देशमुख परिवाराला धीरज देशमुख यांच्या ‘पॉलिटिकल लॉचिंग’चे वेध लागले आहेत.