शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
4
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
5
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
6
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
7
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
9
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
10
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
11
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
12
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
13
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
14
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
16
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
17
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
18
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
19
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
20
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

एन एच ४४ : ‘दीपोत्सव’च्या पानांमध्ये उलगडणार ‘ग्लोबल’ भारतातल्या ‘लोकल’ मुला-माणसांच्या कहाण्या

By admin | Updated: October 14, 2016 07:51 IST

‘मुझे इस ट्रीपपर साथ ले जाते यार, अब क्यूं इतना जेलस बना रहे हो...’- चेतन भगतने आपल्या मनातली चुटपुट अजिबात न लपवता ‘लोकमत वृत्तसमुहा’च्या एका नव्या संकल्पनेची ‘घोषणा’ केली

‘मुझे इस ट्रिपपर साथ ले जाते यार, अब क्यूं इतना जेलस बना रहे हो...,’ चेतन भगतने आपल्या मनातली चुटपुट अजिबात न लपवता ‘लोकमत वृत्तसमूहा’च्या एका नव्या संकल्पनेची ‘घोषणा’ केली.. तेव्हा पुण्यातल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रत्येकालाच वाटले, आपणही कधीतरी ‘अशा’ प्रवासाला निघायला हवे...‘क्षणोक्षणी बदलत्या भारताच्या हृदय-रेषेला स्पर्श करत करत देशाच्या दक्षिण पायथ्यापासून थेट उत्तरेचा माथा गाठणारा प्रवास’ - ही संकल्पनाच थरारून टाकणारी! ‘लोकमत’च्या टीमने हा प्रवास केला आहे ‘दीपोत्सव’ या दिवाळी वार्षिकाच्या निमित्ताने!एन एच ४४!दक्षिणेची कन्याकुमारी आणि उत्तरेचे श्रीनगर अशी दोन टोके जोडणाऱ्या नॅशनल हायवे ४४ या महामार्गाचे बोट धरून केलेला तब्बल ३५ दिवसांचा प्रवास. पत्रकार-छायाचित्रकारांच्या टीमला या प्रवासात दिसलेला देश, भेटलेली माणसे, त्यांच्या सुख-दु:खाच्या कहाण्यांचा रोमांच हे सारे उलगडणार आहे लवकरच प्रसिध्द होत असलेल्या ‘दीपोत्सव’ या दिवाळी अंकात!- समकालीन मराठी पत्रकारितेत प्रथमच होत असलेल्या या विलक्षण साहसी आणि कल्पक प्रयोगाची घोषणा ख्यातनाम लेखक चेतन भगत यांनी पुण्यात केली. त्यांच्यासोबत लोकमत वृत्तसमुहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा उपस्थित होते. 1991 ते 2016 ही पंचवीस वर्षे म्हणजे स्वातर्योत्तर भारताच्या इतिहासातला महत्वाचा टप्पा. जागतिकीकरणाची पंचविशी गाठणार्या ‘ग्लोबल’ भारताची ‘लोकल’ रहस्ये शोधण्यासाठी लेखक-विचारवंतांना नव्हे, तर रस्त्यावरच्या सर्वसामान्य माणसांना भेटण्याचा प्रयोग ‘एन एच 44’च्या निमित्ताने ‘लोकमत’ने केला आहे.दक्षिणेची शांत राज्ये, तेलंगणातला ताजा राग, उत्तर प्रदेश-हरयाणातली घुसमट, ‘उडता पंजाब’ची झुलसती नशा, चंबळच्या खोर्यातला थरार आणि जम्मू-काश्मीरमधली धुम्मस असे सारे सारे या प्रवासात भेटते... आणि भेटते प्रत्येक अडथळ्यावर मात करण्यासाठी झुंजणारी, मागे न हटणारी हिंमत!!...अवघ्या देशाला कवेत घेणाऱ्या एका प्रवासाचा अविस्मरणीय अनुभव : येत्या काही दिवसात ‘दीपोत्सव’मधून!