शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पुढील वर्षी ‘गोवरमुक्त महाराष्ट्र अभियान’ - डॉ. सावंत

By admin | Updated: May 7, 2017 04:46 IST

जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून ‘रुबेला मिजल (गोवर)मुक्त महाराष्ट्र’ अभियान फेब्रुवारी २०१८ पासून राबविण्यात येणार

 लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून ‘रुबेला मिजल (गोवर)मुक्त महाराष्ट्र’ अभियान फेब्रुवारी २०१८ पासून राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत ९ महिने ते १५ वर्षांच्या मुला-मुलींना लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.जागतिक आरोग्य संघटनेचे भारताचे प्रतिनिधी हँक बॅकेडम यांनी शुक्रवारी मंत्रालयात आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांची भेट घेतली. या वेळी राज्याच्या आरोग्याच्या विविध बाबींविषयी चर्चा करण्यात आली. या वेळी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त डॉ. प्रदीप व्यास उपस्थित होते. जागतिक आरोग्य संघटनेने विविध आजारांवरील लसीकरण मोहिमेवर भर दिला आहे. राज्यात राबविण्यात येत असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे जागतिक आरोग्य संघटनेच्या बॅकेडम यांनी कौतुक केले. या अभिनव योजनेच्या माध्यमातून उपचाराबरोबर मोफत शस्त्रक्रिया केली जात असल्याने, सामान्यांना त्याचा फायदा होत असल्याचे बॅकेडम यांनी सांगितले. राज्यात पोलिओ लसीकरण मोहिमेवर विशेष लक्ष देण्यात आले असून, मालेगाव व भिवंडी शहरांमध्ये लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यात यश आले आहे. मात्र, निमशहरी भागात लसीकरणाच्या दरम्यान अडचणी येत असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले. राज्यातील कुपोषण निर्मूलनासाठी आदिवासी भागामध्ये १०० टक्के लसीकरण होण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने पुढाकार घ्यावा. राज्यातील १५ आदिवासी जिल्ह्यांमध्ये बालकांना लसीकरणाची मोहीम हाती घ्यावी व तिचे संनियंत्रण जागतिक आरोग्य संघटनेने करावे. त्याचप्रमाणे, राज्यातील निम्म्याहून अधिक जिल्हे मलेरियामुक्त झाले असून, गडचिरोलीमध्ये मलेरियाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने या भागातही लसीकरण मोहीम आणि संशोधन हाती घ्यावे. राज्यात अन्य आजारांबरोबरच विल्सन डिसीजचे रुग्ण आढळून येतात. महाराष्ट्रासाठी या संदर्भात विशेष प्रयत्न करावेत, अशी आग्रही मागणी आरोग्यमंत्र्यांनी या वेळी केली. स्वाइन फ्लूसाठी नवीन लस राज्यात स्वाइन फ्ल्यूचा काही भागांत प्रादुर्भाव आहे. त्यावर उपाययोजना आणि उपचारासाठी राज्य शासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत. जाणीव-जागृतीबरोबरच राज्यभर सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचबरोबर, ज्या महापालिका क्षेत्रामध्ये स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येतात, त्या महापालिका आयुक्तांशी आरोग्य विभाग सातत्याने संपर्कात राहून मार्गदर्शन करीत आहे. स्वाइन फ्लूवर पुढील वर्षी नवीन लस आणण्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने तयारी केल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.