शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ड्रोनच्या वापरासाठी नवी नियमावली; प्रतिबंधित क्षेत्रात बंदी

By admin | Updated: April 30, 2016 04:28 IST

भारतात आजकाल मोठे कार्यक्रम, क्रिकेट सामने तसेच लग्नसमारंभातही ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.

मुंबई : भारतात आजकाल मोठे कार्यक्रम, क्रिकेट सामने तसेच लग्नसमारंभातही ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. पण ड्रोन म्हणजेच स्वयंचलित उडणारे साधन हे केवळ खेळणे नसून त्याच्या वापरासाठी योग्य काळजी घेण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे. यासाठीच डीजीसीए (डायरेक्टोरेट जनरल आॅफ सिव्हिल एव्हीएशन) ड्रोन वापरासाठी नियमावली तयार करत आहे. ड्रोनमुळे होणारे अपघात टळावेत आणि प्रतिबंधित क्षेत्रात ड्रोन वापरण्यावर बंदी घालण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.सरकारी क्षेत्राबाहेरील कोणत्याही संस्थेस किंवा व्यक्तीस ड्रोन उडविण्यासाठी डीजीसीएची परवानगी घ्यावी लागणार आहे आणि नियमांचे पालन करावे लागणार आहे. ड्रोन वापरणाऱ्यांना यूआयएन (युनिक आयडेंटिफिकेशन नंबर) घेणे आवश्यक आहे. मात्र तुम्ही प्रतिबंध नसलेल्या क्षेत्रामध्ये २०० फुटांच्या खाली ड्रोनचा वापर करत असाल तर या परवानगीची तुम्हाला गरज नसेल. ड्रोनची खरेदी किंवा विक्री तसेच वापरावर आजवर फारसे निर्बंध घालण्यात आलेले नव्हते; मात्र सुरक्षेचा विचार करत डीजीसीएने अशा नियमांचा आधार घेतला आहे. डीजीसीएने तयार केलेल्या नियमावली आराखड्यामध्ये सूक्ष्म, लहान, विशाल असे ड्रोनच्या वजनानुसार प्रकारही केले आहेत. अमेरिकेने ड्रोन वापरणाऱ्यांची नोंदणी बंधनकारक केली आहे. त्यानंतर जपाननेही ड्रोन वापरावर बंधने घातली आणि लोकवस्तीच्या प्रदेशात ती उडविण्यास मज्जाव केला. आॅस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेनेही असेच नियम तयार केले आहेत. ड्रोनच्या वाढत्या वापरामुळे भारतानेही या देशांप्रमाणे नियमावली तयार केली आहे.>यूआयएन कोणाला मिळेल?कोणताही भारतीय नागरिक किंवा ज्या संस्थेचे अध्यक्ष किंवा दोनतृतीयांश संचालक भारतीय आहेत अशांनाच ड्रोन वापरासाठी यूआयडी मिळेल. ड्रोनसारखे कोणतेही स्वयंचलित वाहन वापरणाऱ्याचे वय १८ वर्षांपेक्षा अधिक असावे तसेच त्यांना ड्रोन वापरण्याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक असेल.>इंग्लंडही विचारातलंडनच्या हिथ्रो विमानतळावर जीनिव्हा येथून येणाऱ्या विमानातील वैमानिकाने विमानात ड्रोनसारखी वस्तू अडकल्याची तक्रार केली. या विमानात १३७ प्रवासी प्रवास करत होते. ब्रिटिश सरकारने याची गंभीर दखल घेऊन त्याची चौकशी केली. वैमानिकांच्या संघटनेनेही ड्रोनसाठी कडक नियमावली करण्याची मागणी केली. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने यावर तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी वैमानिकांनी आणि तेथील राजकीय पक्षांनी केली आहे.