शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

श्रीहरी अणेंचा नवा राजकीय पक्ष

By admin | Updated: September 25, 2016 01:22 IST

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी राजकीय पर्याय आवश्यक असल्याचे स्पष्ट करीत राज्याचे माजी महाधिवक्ते व विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी विदर्भ राज्य आघाडी (विरा) या राजकीय पक्षाची

नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी राजकीय पर्याय आवश्यक असल्याचे स्पष्ट करीत राज्याचे माजी महाधिवक्ते व विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी विदर्भ राज्य आघाडी (विरा) या राजकीय पक्षाची शनिवारी घोषणा केली. या पक्षाची लवकरच राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्यात येईल. यानंतर निवडणुका लढविल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. विदर्भ राज्य आघाडीतर्फे (विरा) लकडगंज येथे विदर्भस्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याला मार्गदर्शन करताना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष श्रीहरी अणे यांनी ही घोषणा करताना, आगामी स्थाानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून रिंगणात उतरण्याचे जाहीर केले. १ मे २०१५ रोजी सिंदखेड राजा येथे विदर्भ राज्य आघाडी स्थापन करण्यात आली होती. या संघटनेंतर्गत आतापर्यंत विदर्भ राज्यासाठी लढा देण्यात आला. परंतु केवळ आंदोलनमुळेच स्वतंत्र राज्य मिळत नाही, हा इतिहास आहे. त्यामुळे राजकीय पर्याय आवश्यक असल्याचे ते म्हणाले.विदर्भ राज्य आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्वच जागा लढवणार नाही. ज्या जागांवर लढणे शक्य आहे; त्याच जागा लढवणार असल्याचे अ‍ॅड. अणे यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना स्पष्ट केले. (प्रतिनिधी)...तर फेरविचार भाजपा व काँग्रेस हे दोघेही राजकीयदृष्ट्या आमच्यासाठी सारखेच पक्ष आहे. भाजपाने विदर्भ दिला तर पेढे वाटू. भाजपमध्ये एकाच माणसाची चालते ते म्हणजे नरेंद्र मोदी. परंतु ते दिल्लीत राहतात. त्यांना विदर्भ राज्य द्यायचे नाही, असे सांगून श्रीहरी अणे म्हणाले, भाजपाने दिल्लीत स्वतंत्र विदर्भाचा शासकीय ठराव आणला तर मात्र आपण आपल्या निर्णयाचा फेरविचार करू.मराठा समाजाच्या मोर्चासंदर्भात अ‍ॅड. अणे यांना पत्रकारंनी विचारले असता ते म्हणाले, त्यांना आरक्षण मिळायला हवे, परंतु आरक्षणासाठी सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण हे निकष तपासून पाहावे व त्यांना आरक्षण द्यावे. दुसरा मुद्दा अ‍ॅट्रॉसिटीचा आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा कधीकधी दुरुपयोग होतो, ही बाब खरी असली तरी एकच समाज सातत्याने जातीय अत्याचाराला बळी पडत आहे, ही सुद्धा वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.