शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बालगृहांबाबत लवकरच नवे धोरण

By admin | Updated: August 20, 2016 01:45 IST

राज्यातील बोगस बालगृहे आणि तेथील मुलांच्या पटपडताळणीच्या पार्श्वभूमीवर गरजू आणि अनाथ बालकांना न्याय मिळावा, बालगृहांचा वसतिगृहाप्रमाणे उपयोग केला जाऊ नये

पुणे : राज्यातील बोगस बालगृहे आणि तेथील मुलांच्या पटपडताळणीच्या पार्श्वभूमीवर गरजू आणि अनाथ बालकांना न्याय मिळावा, बालगृहांचा वसतिगृहाप्रमाणे उपयोग केला जाऊ नये, यासंदर्भातील नवे धोरण लवकरच आणणार असल्याची माहिती राज्याच्या ग्रामविकास आणि महिला, बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी दिली.पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापात त्या बोलत होत्या. यावेळी सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार मेधा कुलकर्णी उपस्थित होते. मुंडे म्हणाल्या, ‘सध्या महाराष्ट्रातील बालगृहांमध्ये सुमारे ८०,००० मुले आहेत. इतर राज्यातील बालगृहांमध्ये ही संख्या साधारणपणे अडीच ते तीन हजारांच्या दरम्यान आहे. ज्या बालगृहांमध्ये प्रामाणिकपणे काम केले जाते, त्यांना संपूर्ण निधी मिळण्यासाठी महिला आणि बालविकास विभागातर्फे प्रयत्न केले जातात. गरीब, गरजू आणि अनाथ मुलांना संरक्षण देण्याच्या दृष्टीने बालगृहांची स्थापना करण्यात आली. बालगृहांमध्ये गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा, यादृष्टीने १२ विविध पोटकलम लावण्यात आले आहेत. या निकषांबाबतचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आला असून त्यांच्याकडून उत्तर मिळाले आहे. त्यामुळे बालगृहांबाबत लवकरच नवे धोरण राबविले जाणार असून त्याबाबत बालहक्क आयोगाकडून मार्गदर्शक तत्वे मागवण्यात आली आहेत.’ लैंगिक अत्याचारातील पीडित महिला आणि तरुणींच्या समुपदेशनासाठी राबवण्यात येणाऱ्या मनोधैर्य योजनेसाठी जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न असून गुन्ह्यांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठीही सरकारतर्फे सकारात्मक प्रयत्न सुरु असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)‘राज्यातील विविध भागांच्या अनुशेषाप्रमाणे निधीचे वितरण केले जाते. अनुशेषाप्रमाणे विकासाला गती देत असताना कोणत्याही भागावर अन्याय होणार नाही.’-पंकजा मुंडे, ग्रामविकास मंत्री