शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅपच्या माध्यमातून सेवा देणाऱ्या टॅक्सीसाठी नवे धोरण - रावते

By admin | Updated: June 23, 2016 04:25 IST

ओला, उबरसारख्या टॅक्सींच्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवीन धोरण अमलात आणणार आहे. मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून सेवा देणाऱ्या टॅक्सी कंपन्यांसाठी परिवहन

मुंबई : ओला, उबरसारख्या टॅक्सींच्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवीन धोरण अमलात आणणार आहे. मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून सेवा देणाऱ्या टॅक्सी कंपन्यांसाठी परिवहन विभागाने धोरण तयार केले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेनंतर धोरण लागू करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी दिली. नव्या धोरणामुळे ओला, उबर आदी कंपन्यांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार आहे.परिवहन विभागाच्यावतीने राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना रावते म्हणाले की, अ‍ॅपच्या माध्यमातून सेवा पुरवणाऱ्या ओला, उबर आदी कंपन्यांकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारणी होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या कंपन्यांच्या टॅक्सींना देखील सामान्य टॅक्सीप्रमाणे मीटर लावणे बंधनकारक करण्यात येईल. त्यामुळे या कंपन्यांच्या माध्यमातून धावणाऱ्या टॅक्सींच्या दरात सुसूत्रता येईल. तसेच अ‍ॅपच्या माध्यमातून चालणाऱ्या टॅक्सींना केवळ मुंबई महानगरांतच परवानगी देण्यात येईल, असे रावते म्हणाले. सरकारच्या प्रस्तावित धोरणामुळे सर्जच्या नावाखाली दुप्पट-तिप्पट भाडे वसूल करण्याचे प्रकार थांबणार आहेत. द्रुतगती मार्गावर बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर तसेच वाहतूक नियमांचे भंग करणाऱ्यांविरोधात परिवहन विभागाने ९ जून ते १७ जून दरम्यान विशेष मोहिम हाती घेण्यात आले होते. या मोहिमेत एकूण ४ हजार ९३२ वाहने दोषी आढळली असून, त्यांच्याकडून तब्बल ६८ लाखांचा दंड वसूल करण्यात आला, तर ३४ वाहने जप्त करण्यात आली. वाहन तपासणी मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी तपास पथकांच्या वाहनांवर कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पनवेल आणि पिंपरी-चिंचवड परिवहन कार्यालयातील पथकांच्या वाहनांवर कॅमेरे बसवून वाहनांची तपासणी करण्यात आली. हा प्रयोग राज्यात प्रथमच करण्यात आला आहे. या कॅमेऱ्यांच्या साहाय्याने लेन कटिंग आणि वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या ७५० वाहनमालकांना घरपोच नोटीस देण्यात आल्या आहेत. तर उर्वरितांना नोटीसाची कार्यवाही सुरूअसल्याचे रावते यांनी सांगितले. (प्रतिनिधी)