शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा कार्यकारिणीत नव्या चेह:यांना संधी

By admin | Updated: August 3, 2014 02:06 IST

पाच दिवसांत पार्टीची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर होणार असून, महाराष्ट्रातील नवीन चेह:यांना स्थान देण्यात येणार आहे.

रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या निवडीवर 9 ऑगस्टला राजधानीत होणा:या राष्ट्रीय परिषदेत सर्वसहमतीची मोहर उमटल्यानंतर, पाच दिवसांत पार्टीची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर होणार असून, महाराष्ट्रातील नवीन चेह:यांना स्थान देण्यात येणार आहे. 
215 जणांच्या सध्याच्या कार्यकारिणीत 12 जण महाराष्ट्रातील आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री प्रकाश जावडेकर, रावसाहेब दानवे पाटील, विनय सहस्त्रबुद्धे, पूनम महाजन, एकनाथ खडसे, विनोद तावडे, किरीट सोमय्या, पांडुरंग फुंडकर, सुधीर मुनगंटीवार, शायना एन.सी, अजय संचेती हे सध्या कार्यकारिणीत आहेत. जावडेकर हे पक्षप्रवक्ते तर महाजन या राष्ट्रीय सचिव आहेत. 
 सूत्रने सांगितले,की राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांना राष्ट्रीय सरचिटणीस पदावर नेमण्यात येणार होते, तीन दिवसांपूर्वी त्यांच्याशी चर्चाही झाली. मात्र राज्यात निवडणुका असल्याने त्यांनी नकार दिला आहे. आपल्याशी चर्चा झाली असून, आपण नकार दिल्याचे तावडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. त्यानंतर याच पदासाठी मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आशिष शेलार यांचे नाव पुढे आले. भाजपातील गटबाजी त्यांच्या मुळावर येण्याची शक्यता आहे. 
  प्रकाश जावडेकर यांच्या जागेवर पक्षाचे मुख्यप्रवक्ते म्हणून विनय सहस्त्रबुद्धे यांना आणले जाऊ शकते. संघाने या नावाला पसंती दिली आहे. शायना एन.सी कार्यकारिणी सदस्य आहेत. त्यांचेही नाव प्रवक्त्यांच्या यादीत आहे. पूनम महाजन यांना पदोन्नती द्यावी असा एका गटाचा प्रयत्न सुरू आहे.  
पुण्यातील आमदार गिरीश बापट यांना राष्ट्रीय राजकारणात आणण्याचा विचार संघ करीत आहे.    खजिनदार पीयूष गोयल राज्यमंत्री झाल्याने त्यांच्या जागी महाराष्ट्रातून कोणालाही न घेता, हे पद  गुजरातच्या ताब्यात देण्यावर शहा यांचा भर आहे. तथापि, त्यांनाच या पदावर कायम ठेवावे यासाठी प्रयत्न होत आहेत. आता हा तिढा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करूनच सुटणार    आहे. 
यापूर्वीच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडून काही नावांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत, मात्र  अंतिम निर्णय मोदी व शहा यांचाच असेल. कार्यकारिणीची यादी जाहीर करण्यापूर्वी संघाचे मत घ्या, असे शहा यांना नागपूर भेटीत स्पष्टपणो सांगण्यात आल्याने गडकरी यांच्या शब्दाला बळ मिळण्याची शक्यता आहे.