शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
3
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
4
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
5
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
6
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
7
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
8
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
9
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
10
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
11
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
12
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
13
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
14
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
15
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
16
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
17
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
18
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
19
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
20
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 

पक्षीय आघाड्यांचा नवा नाशिक पॅटर्न

By admin | Updated: March 15, 2017 00:29 IST

एकमेकांविरोधात शिमगा करणाऱ्या राजकीय पक्षांनी स्थानिक पातळीवर एकमेकांना पायघड्या घातल्याचे दिसून आले. नाशिक जिल्ह्यातील पाच पंचायत समित्यांमध्ये दोन

नाशिक : एकमेकांविरोधात शिमगा करणाऱ्या राजकीय पक्षांनी स्थानिक पातळीवर एकमेकांना पायघड्या घातल्याचे दिसून आले. नाशिक जिल्ह्यातील पाच पंचायत समित्यांमध्ये दोन भिन्न विचारसरणीच्या पक्षांनी परस्परांच्या गळ्यात गळे घालत सत्ता काबीज केल्याने पक्षीय सामिलकीचा नवा नाशिक पॅटर्नच निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापतींची निवडणूक मंगळवारी (दि.१४) झाली. अपेक्षेप्रमाणे शिवसेनेने सर्वाधिक (५) पंचायत समित्यांवर एक हाती सत्ता मिळवत भगवा फडकविला व ग्रामीण भागात आपले पाय मजबुतीने रोवले. पाचही ठिकाणी शिवसेनेचे निर्विवाद बहुमत आहे. मात्र दिंडोरी येथे कॉँग्रेसला उपसभापतीपद देऊन शिवसेनेने सभापतीपद तर देवळा येथे राष्ट्रवादीला सभापतीपद देऊन उपसभापतीपद मिळविले आहे. शिवसेनेप्रमाणेच चांदवड तालुक्यात भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी कॉँग्रेसशी हातमिळवणी करुन सभापतीपद मिळविले आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसने माकपाशी युती करुन आपल्या पदरात उपसभापतीपद पाडून घेतले आहे. देवळा पंचायत समितीत राष्ट्रवादीला शिवसेनेची साथ मिळाली असून दिंडोरी पंचायत समितीमध्ये कॉँग्रेसने शिवसेनेसमोर नांगी टाकत त्यांच्यासोबत थेट गट नोंदणी करुन उपसभापतीपद पदरात पाडून घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. स्थानिक आमदार राष्ट्रवादीचे असताना तसेच तालुक्यातील साखर कारखान्यासह अन्य संस्थांमध्ये सत्ता असलेल्या राष्ट्रवादीला कुठल्याही परिस्थितीत पंचायत समितीमधील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ही खेळी खेळली गेली आहे. सटाणा (बागलाण) तालुक्यात राष्ट्रवादीने भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. १४ सदस्य संख्या असलेल्या बागलाण पंचायत समितीमध्ये भाजपाचे ७ सदस्य निवडून आले आहेत. बहुमतासाठी एका सदस्याची आवश्यकता असताना भाजपाला येथे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या दोन सदस्यांसह तब्बल ४ जणांची साथ मिळाली आहे.नवी समीकरणेनाशिक जिल्ह्यात युती व आघाडीची पारंपरिक समीकरणे मोडून पंचायत समित्यांमधील सत्तेसाठी जुळविली गेलेली नवी समीकरणे याप्रमाणे- चांदवड : भाजपा - राष्ट्रवादी त्र्यंबकेश्वर: माकपा-राष्ट्रवादी देवळा : राष्ट्रवादी -शिवसेना दिंडोरी : शिवसेना- कॉँग्रेस सटाणा : भाजपा- राष्ट्रवादीजिल्ह्यातील १५ पैकी इगतपुरी, पेठ, नांदगाव, येवला, दिंडोरी, सिन्नर, निफाड अशी सर्वाधिक सात सभापतिपदे शिवसेनेने मिळविली असून कळवण, मालेगाव, देवळा, नाशिक अशी चार सभापतिपदे राष्ट्रवादीला मिळाली आहेत. चांदवड व सटाणा येथील दोन भाजपाला तर त्र्यंबकेश्वर व सुरगाणा अशी दोन सभापतिपदे माकपाला मिळाली आहेत.