शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-कलानी युतीचा नवा अध्याय

By admin | Updated: February 14, 2017 00:52 IST

आजवर राजकारणाच्या गुन्हेगारीबद्दल नाकाने कांदे सोलणाऱ्या भारतीय जनता पक्षाने उल्हासनगरात कुख्यात पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी

सदानंद नाईक/पंकज पाटील / उल्हासनगरआजवर राजकारणाच्या गुन्हेगारीबद्दल नाकाने कांदे सोलणाऱ्या भारतीय जनता पक्षाने उल्हासनगरात कुख्यात पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी यांच्यासोबत युती केल्याने या पक्षाचे कथित सोवळे गळून पडले आहे. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने लिहिला गेलेला गुन्हेगारीकरणाचा नवा अध्याय, भविष्यात भाजपाला कुठे घेऊन जातो, हे पाहणे मोठे रंजक ठरणार आहे.भाजपा-कलानी ही अनैसर्गिक युती असल्याने, त्यामध्ये अविश्वासाचे वातावरण आहे. त्यामुळे ओमीचे उमेदवार स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते, पण भाजपाने त्यांना ‘कमळ’ चिन्हावर लढण्यास भाग पाडून भविष्यातील राजकीय तडजोडीचा वाव ठेवला नाही. भाजपाचे उल्हासनगरातील नेते कुमार आयलानी यांचा ओमी यांना सोबत घेण्यास विरोध होता. मात्र, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व अन्य काही नेते कलानी यांना भाजपात आणण्याकरिता उत्सुक होते. ‘कलानी म्हणजे उल्हासनगर’ हे समीकरण पप्पू कलानी जेलमध्ये गेल्याने विस्कटले. आता ओमी यांना पत्नी पंचम कलानी यांना महापौरपदी बसवून गमावलेली सत्ता काबीज करायची आहे. लागलीच भाजपातील कलानीविरोधी गट सक्रिय झाला आहे. त्यामुळे या अंतर्विरोधाचा भाजपाला फटका बसू शकतो. रामदास आठवले यांच्या रिपाइंने इथे शिवसेनेबरोबर हातमिळवणी केली आहे.महापालिकेत आतापर्यंत शिवसेना, भाजपा, रिपाइं व साई या पक्षांची सत्ता होती. उल्हासनगर हे भीषण पाणीटंचाई, अस्वच्छता, बेकायदा बांधकामे, सार्वजनिक वाहतुकीचा अभाव अशा असंख्य समस्यांचे आगार आहे. साहजिकच, त्यामुळे शिवसेनेबद्दल अँटी इन्कम्बन्सी आहे. भाजपाने कलानींसोबत हातमिळवणी केल्याने, शिवसेनेनेही सिंधी कार्ड खेळले आहे. सिंधी उमेदवार रिंगणात उतरवण्याबरोबर विभागीय मेळावे सिंधीबहुल परिसरात घेतले.