शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

होमिओपॅथीसाठी नवा सर्टिफिकेट कोर्स

By admin | Updated: September 18, 2015 00:49 IST

देश व जगभरात वैद्यकीय क्षेत्रातील बदलाचा वेध घेत आरोग्य विज्ञान विद्यापीठाने होमिओपॅथी विद्या शाखेचा विस्तार करण्यासाठी पावले उचलली आहेत. यात अनेक प्रकारचे रोजगाराभिमुख

पुणे : देश व जगभरात वैद्यकीय क्षेत्रातील बदलाचा वेध घेत आरोग्य विज्ञान विद्यापीठाने होमिओपॅथी विद्या शाखेचा विस्तार करण्यासाठी पावले उचलली आहेत. यात अनेक प्रकारचे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम विद्यापीठाकडून लवकरच आणले जाणार आहेत. त्यासाठी एक खास प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. आपल्या शिक्षणपद्धतीत पुस्तकी ज्ञान आणि त्याचा प्रत्यक्ष होणारा उपयोग यामध्ये मोठी तफावत असते. या पार्श्वभूमीवर हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. ‘सर्टिफिकेट कोर्स इन फार्माकॉलॉजी’ असे होमिओपथीच्या या नव्या अभ्यासक्रमाचे नाव असून तो एक वषार्चा असणार आहे. या अभ्यासक्रमातून होमिओपॅथी व्यावसायिक व रोजगाराभिमुख होणार आहे. तूर्तास हा अभ्यासक्रम राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुरू केला जाणार असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी सांगितले.होमिओपॅथीच्या प्रॅक्टीसचा १० वर्षांचा अनुभव असणारे डॉक्टर हा अभ्यासक्रम करु शकतील. पूर्वी हा अभ्यासक्रम पूर्ण वेळाचा असल्याने प्रॅक्टीस करताना तो करणे काही प्रमाणात अवघड होत होते. मात्र आता या अभ्यासक्रमाचे तास तेवढेच ठेवून तो शनिवार व रविवारी करण्यात आल्याने आपली प्रॅक्टीस संभाळून होमिओपॅथीच्या डॉक्टरांना तो करता येणार आहे. तर दुसरीकडे राज्यातील होमिओपथी वैद्यकीयसाठी हा अभ्यासक्रम आठवड्यातून दोन दिवस सुरू राहील. प्रत्येक दिवशी आठ तास म्हणजे सहा तास तासिका व दोन तास प्रात्यक्षिक असेल. यातील चार तास आपत्कालीन विषयाचे शिक्षण दिले जाणार आहे. (प्रतिनिधी)हा अभ्यासक्रम सुरु व्हायला साधारण एक महिना लागेल. सध्या या अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयाने उपलब्ध कर्मचारी वर्गाचा वापर करावा. ६ महिन्यांनी त्यांना या विशिष्ट अभ्यासक्रमासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती मंजूर केली जाईल. या अभ्यासक्रमात अ‍ॅलोपॅथीच्या अभ्यासक्रमातील काही भागाचा समावेश करण्यात आला असल्याने अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरांना हा अभ्यासक्रम झालेले होमिओपॅथीचे डॉक्टर असिस्ट करु शकतील. - डॉ. अरुण जामकर, कुलगुरु,महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ