शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

सलोख्याचा नवा करार!

By admin | Updated: February 1, 2015 03:00 IST

समुद्रकिनाऱ्यावरचं गाव. हिंदू आणि मुस्लीम अशी दोन्ही समाजांची वस्ती. १९८७ साली काही कारणावरून तेढ निर्माण झाले आणि या दोन समाजांत दंगल झाली.

गावाने केली आचारसंहिता : संवेदनशील बुरोंडीचा पुरोगामी निर्णयशिवाजी गोरे - दापोलीसमुद्रकिनाऱ्यावरचं गाव. हिंदू आणि मुस्लीम अशी दोन्ही समाजांची वस्ती. १९८७ साली काही कारणावरून तेढ निर्माण झाले आणि या दोन समाजांत दंगल झाली. तेव्हापासून गाव संवेदनशील म्हणून नोंदलं गेलं. दोन्ही समाजांत अधूनमधून कुरबुरी सुरूच होत्या. त्याचे परिणाम दोन्ही बाजूंच्या लोकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना भोगायला लागले आणि त्या वेदनेतूनच उदय झाला तो एका नव्या सामाजिक कराराचा. दोन्ही समाजांनी एकत्र येत यापुढे एकोप्याने नांदण्यासाठी एक आचारसंहिता तयार केली अन् ती १०० वर्षे पाळण्याचा लेखी करारही केला़ जातीय सलोख्याचा आदर्श वस्तुपाठ घालून देणारं हे गाव आहे रत्नागिरी जिल्ह्यातील बुरोंडी (ता़ दापोली).बुरोंडी तसं डोंगरकपारीतील दाट लोकवस्तीचं गाव. गावात १९८७ साली हिंदू कोळी बांधवांची वरात मशिदीसमोरून जात असताना वरातीसमोर नाचण्यावरून दोन्ही समाजांत दंगल उसळली. या घटनेमुळे गावात धार्मिक तेढ निर्माण झाले. बुरोंडीचे सामाजिक कार्यकर्ते कै. युसूफभाई मस्तान आणि हिंदू पंचक्रोशी अध्यक्ष प्रदीप सुर्वे यांनी पुढाकार घेऊन दोन्ही बाजंूच्या लोकांची मने जुळविण्याचा प्रयत्न केला. त्याला तब्बल दोन वर्षे लागली. त्यानंतर हा वाद गावातील बैठकीत सामोपचाराने मिटविण्याचा निर्णय झाला. दोन्ही समाजांनी आपल्या चुका कबूल केल्या. तडजोडनामा कोर्टात सादर करून वाद मागे घेण्यात आला. त्यानंतर काही काळ गाव शांत होते; पण अधूनमधून छोट्या छोट्या घटना घडत होत्या़ २०१२ साली मशिदीसमोरील मोकळ्या जागेत गोविंदाची तिसरी फेरी सुरू असताना मुस्लीम तरुणाने हल्ला चढविला. त्यामुळे दोन्ही समाजांतील वातावरण चांगलेच तापले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. या प्रकाराचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटण्याआधी पोलिसांनी गावात समन्वय समिती नेमली. या समितीच्या माध्यमातून हिंदू धर्मातील गोविंदा, गणपती, गौरी, ईद, इफ्तार पार्टी, उरूस, इत्यादी सण-उत्सव शांततेत साजरे करण्याचा निर्णय झाला. २०१२च्या घटनेनंतर बुरोंडीचे सरपंच प्रदीप राणे यांनी इफ्तार पार्टीची प्रथा सुरू करून दोन्ही समाजांचीे मनं जुळविण्याचा प्रयत्न सुरू झाला़ नोव्हेंबर २0१४ मध्ये समन्वय समितीच्या बैठकीत सामाजिक सलोख्यासाठी आचारसंहिता तयार करण्याचा निर्णय झाला़ त्यानुसार मसुदा तयार करून त्यावर सर्व धर्मांतील प्रमुखांच्या स्वाक्षऱ्या झाल्या अन् तो मसुदा १०० वर्षांसाठी लागू करण्यात आला. त्याच्या नोटरी केलेल्या प्रती सर्वांकडे ठेवण्यात आल्या आहेत.गावातील दोन्ही घटनांमुळे हे संवेदनशील गाव म्हणून गणले जाऊ लागले. गावाला लागलेला कलंक पुसून टाकण्यासाठी आणि दोन्ही धर्मीयांचे मनोमिलन करण्यासाठी २०१२ पासून मुस्लीम बांधवांना इप्तार पार्टीची प्रथा गावात सुरू केली व दोन्ही समाजांचे मनोमिलन व्हायला सुरुवात झाली.- प्रदीप राणे, सरपंच जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना चपराक बसावी, बुरोंडी गावचा आदर्श देशाने घेतल्यास दोन्ही धर्मीयांतील सामाजिक सलोखा वाढण्यास मदत होईल. दोन्ही धर्मीयांतील पुढील पिढी आमचा आदर्श नक्की घेईल.- प्रदीप सुर्वे, अध्यक्ष, समन्वय समिती हा करार म्हणजे दोन्ही समाजांसाठी शांतीचे शुभ प्रतीक आहे. काही किरकोळ गैरसमजांमधून मतभेद होतात. हे मानवतेला काळिमा फासणारे आहे. त्यामुळे राज्यातील इतर ठिकाणीही असाच आदर्श घेऊन आचारसंहिता तयार केली जावी व त्याचे पालन केले जावे.- महंमद साब दिवेकरअशी आहे आचारसंहिता़़़च्जातीय सलोख्याच्या आचारसंहितेची नोटरी करण्यात येऊन त्याच्या प्रती सर्वांकडे ठेवण्यात आल्या आहेत.च्हिंदू मिरवणुका, लग्न, गणपती उत्सव, पालखी या मशिदीजवळून जाताना वाजतगाजत जातील. परंतु नमाज चालू असेल तर नमाज होईपर्यंत कोणतीही मिरवणूक ठरावीक अंतरावर थांबेल, नमाज संपल्यानंतर पुढे जाईल.च्मुस्लीम समाजाच्या उरसाला मारुती मंदिर ते करजगाव दर्गा यामध्ये हिंदू समाजबांधव सहकार्य करतील.च्गोविंदा प्रथेप्रमाणे मशिदीजवळून नाचत जाईल, मात्र मशिदीसमोर अल्लाला मानवंदना म्हणून केवळ एकच फेरी मारेल. च्दोन्ही धर्मीयांचे सण एकोप्याने साजरे केले जातील. त्यासाठी कोणत्याही सणात दोन्ही बाजूंच्या समाजांनी एकमेकांना सहभागी करून घ्यायचे आहे.च्गावातील कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दोन्ही समाजांतील लोकांना निमंत्रित केले जाईल आणि मानसन्मान दिला जाईल.