शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
4
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
5
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
6
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
7
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
8
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
9
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
10
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
11
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
12
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
13
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
14
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
15
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
16
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
17
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
18
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
19
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
20
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
Daily Top 2Weekly Top 5

कधीच काश्मीरमध्ये न राहिलेले देतायत काश्मिरी पंडितांसाठी लढा - नसीरुद्दीन शहांचा अनुपम खेरना टोला

By admin | Updated: May 28, 2016 11:48 IST

जी व्यक्ती (अनुपम खेर) कधीच काश्मिरमध्ये राहिलेली नाही, तीच व्यक्ती काश्मिरी पंडितांसाठी लढताना दिसत आहे. आता अचानक ती व्यक्ती 'विस्थापित' बनली आहे, अशी टीका नसिरुद्दीन शहांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २८ - आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी तीन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले दिग्गज अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी त्यांचे सहकलाकार व अभिनेता अनुपम खेर यांच्यावर निशाणा साधल्याने त्यांच्यात नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहे. अनुपम खेर हे काश्मिरी पंडितांसाठी लढा देताना, खो-यातील त्यांच्या पुनर्वसनासाठी आवाज उठवताना दिसतात, त्याच मुद्यावरून शहा यांनी खेर यांच्यावर टीका केली आहे. ' जे लोक व्यक्ती (खेर) कधीच काश्मिरमध्ये राहिले नाहीत, तेच आता काश्मिरी पंडितांसाठी लढा देताना दिसत आहे. आता अचानक ती व्यक्ती 'विस्थापित' बनली आहे' अशा शब्दांत नसीरुद्दीन शहा यांनी खेर यांच्यावर निशाणा साधला आहे. शुक्रवारी एका कार्यक्रमादरम्यान बोलतान शहा यांनी खेर यांच्यावर टीका केली तसेच केंद्र सरकारबद्दलही टिपण्णी केली. 

आपल्याकडे लोक (जनता) कोणत्याही सरकारबाबत फार लवकर मतं बनवतात आणि निष्कर्ष काढतात, मात्र त्यांनी अशी घाई करू नये, आपण सरकारला आणखी (सिद्ध करण्यासाठी) वेळ देणं गरजेचं आहे, असे शहा यांनी म्हटले. मात्र शहा यांनी सरकारबाबत काहीप्रश्नही उपस्थित केले.  ज्याप्रमाणे काही पाठ्यपुस्तकांत, अभ्यासक्रमातील माहितीमध्ये काटछाट करून बदल करण्यात येत आहे, ते पाहून काळजी वाटते. मात्र देशाला अंधारयुगाकडे नेण्याइतपत हे सरकार मूर्ख नाही, असेही ते म्हणाले.  
दरम्यान अनुपम खेर यांनीही शहा यांच्या टीकेला ट्विटरवरुन उत्तर दिले आहे. 'शाह साब की जय हो. या (तुमच्या) तर्कानुसार एनआरआय लोकांनी (अनिवासी भारतीय) तर भारताबाबत बिलकुल विचार करायलाच नको' असा टोला खेर यांनी ट्विटरवरून हाणला आहे.