शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

सुपर कम्युनिकेशन वेवर कृषी प्रक्रिया उद्योगांचे जाळे

By admin | Updated: May 19, 2016 05:29 IST

प्रस्तावित मुंबई-नागपूर सुपर एक्स्प्रेस कम्युनिकेशन वेवर टाउनशिप उभारतानाच त्या परिसरात कृषी प्रक्रिया उद्योगांचे मोठे जाळे निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

मुंबई : प्रस्तावित मुंबई-नागपूर सुपर एक्स्प्रेस कम्युनिकेशन वेवर टाउनशिप उभारतानाच त्या परिसरात कृषी प्रक्रिया उद्योगांचे मोठे जाळे निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. विकासाच्या या महामार्गासंदर्भात फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानाहून पाच विभागीय आयुक्त आणि ११ जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू करावी. शेतकरी आणि इतर जमीन मालकांना चांगले आर्थिक पॅकेज देण्यासंदर्भातील निर्णय शासन लवकरच घेईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या वेळी सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील आणि विजय देशमुख, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार आदी उपस्थित होते. मोपलवार यांनी या महामार्गासंदर्भात सादरीकरण केले. या महामार्गावर २३ ठिकाणी टाउनशिप उभारण्यात येणार आहेत. प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पाविषयी खात्री यावी आणि महामार्गासोबतच आजूबाजूच्या पायाभूत सुविधाही उभ्या राहाव्यात, यासाठी टाउनशिपचे नियोजन युद्धपातळीवर करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. टाउनशिपमध्ये वा त्याला जोडून कृषी प्रक्रिया उद्योगांची उभारणी करण्यावर, तसेच माल साठवणुकीची (कोल्ड स्टोअरेजसह) उभारण्यास प्राधान्य द्यावे. जिल्ह्यातील मान्यवर व्यक्ती, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधींशी चर्चा करावी, असे मुख्यमंत्री म्हणाले. (प्रतिनिधी)