शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

नीरा-बारामती रस्ता की मृत्यूचा सापळा ?

By admin | Updated: April 7, 2017 01:10 IST

नीरा-बारामती रस्तावर वाहतूक वाढल्याने अनेक ठिकाणी हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.

सोमेश्वरनगर : नीरा-बारामती रस्तावर वाहतूक वाढल्याने अनेक ठिकाणी हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्यात आलेले वृक्ष, धोकादायक वळणे, चढ-उतार व रस्त्यालगतची वठलेली झाडे, हे नेहमीच अपघाताला आमंत्रण देत असतात. अनेक वेळा अपघात होऊनही बांधकाम विभाग मात्र याकडे डोळेझाक करत आहे. काही दिवसांपूर्वी रस्ता वाढला मात्र अपघात काही कमी झाले नाहीत. त्यामुळे निरा बारामती रस्त्यावर वाहन चालविणे म्हणजे मृत्युला आमंत्रण देण्यासारखे आहे. अनेक ठिकाणचे पुल अजूनही त्याच स्थितीत आहेत. रस्त्यालगतची अनेक झाडे ही जळाली असून ती कोणत्याही क्षणी वाहनचालकाच्या जिवावर बेतू शकतात. तसेच मागील काही दिवसात रस्त्याचे रूंदीकरण झाले मात्र हे रूंदीकरण करत असताना रस्त्यालगतची झाडे ही रस्त्यामध्ये आली आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण अजून वाढले. तसेच अनेक ठिकाणी साईट पट्ट्या खचल्या आहेत. निरा बारामती रस्त्यावरील कोऱ्हाळे जवळीत सर्वांत धोकादायक असे वळण म्हणून कठीण पुलाला ओळखले जाते. काही दिवसांपुर्वीच याठिकाणी रस्त्याचे रूंदीकरण करण्यात आले आहे. मात्र नीरा डाव्या कालव्यावरील पुल मात्र अरूंद आणि जुनाच आहे. तो बदलण्याची तसदी घेतलेली दिसत नाही. या ठिकाणी अनेक वेळा एसटी बस व खाजगी वाहने पलटी झाल्याचे प्रकार घडले आहेत. बारामती वरून निरेकडे जात असताना या पुलाजवळ आल्यास समोरील रस्ताच दिसत नाही. त्यामुळे वळायचे कुठे हा प्रश्न वाहनचालकांना पडतो. रोजचा प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना हा रस्ता नित्याचा बनला आहे. मात्र परगावावरून येणारे वाहनचालक हमखास या ठिकाणी फसतात. रात्रीच्या वेळी परगावातील वाहनांना या ठिकाणी हमखास अपघाताला समोरे जावे लागते. (वार्ताहर)>अनेक ठिकाणी वठलेले वृक्षनीरेपासून ते बारामतीपर्यंत रस्त्यालगतचे अनेक वृक्ष पुर्णत; वठून गेले. पूर्ण वृक्षच वाळला असून त्याला वाळवी लागली आहे. तो कोणत्याही क्षणी रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनांवर कोसळू शकतात. वादळी वाऱ्यात हेच वृक्ष कोलमडून अनेक तास वाहतुकीचा खोळंबा होत आहे. मात्र संबंधित विभाग याकडे लक्षच देत नाही. त्याच बरोबर जेव्हा काही दिवसांपूर्वी नीरा ते कोऱ्हाळे या दरम्यान रस्त्याचे रूंदीकरण करण्यात आले त्यावेळी संबंधित ठेकेदाराने रस्ता मोठमोठया वृक्षांच्या बुंध्यापर्यंत केला काही वृक्ष तर अक्षरश: रस्त्यामध्येच आले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी अपघातांचे प्रमाण वाढले आहे.>पणदरे खिंडीतील चढण काढण्याची मागणीपणदरे खिंड-नीरा बारामती रोड जसा अस्तित्वात आला तेव्हापासून या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पणदरे खिंड चांगलीच परिचित आहे. काही वर्षांपूर्वी रात्री नऊनंतर या खिंडीत प्रवाशांना अडवून लूटमारीचे प्रकार घडत होते. हे प्रकार अलीकडे कमी झाले आहे. मात्र या ठिकाणी दोन्हीकडील वाहनांना अजूनही डोंगर चढून रस्ता पार करावा लागतो. तसेच याठिकाणी अनेक वेडीवाकडे वळणे असून अनेक अपघातही झाले आहेत. संबंधित विभाग मात्र हा कडे लक्ष देत नाही. या ठिकाणाचा डोंगरावरील चढ त्वरित काढून टाकण्याची मागणी वाहनचालक करत आहेत.