शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

एचआयव्हीबाधित रुग्णांना एसटीच्या भाडे सवलतीची गरज

By admin | Updated: August 16, 2015 00:03 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या भाड्यात क्षय व कुष्ठरुग्णांसह विविध घटकांना सवलत दिली जाते. त्याच धर्तीवर एचआयव्हीबाधित रुग्णांनाही प्रवास सवलत देण्याची गरज असून

बुलडाणा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या भाड्यात क्षय व कुष्ठरुग्णांसह विविध घटकांना सवलत दिली जाते. त्याच धर्तीवर एचआयव्हीबाधित रुग्णांनाही प्रवास सवलत देण्याची गरज असून, यासाठी या रुग्णांवर उपचार करणाऱ्या केंद्रांकडून राज्य शासनाकडे दोन वर्षांपासून पाठपुरावाही सुरू आहे. राज्य शासनाने १६ जुलै रोजीच्या शासन निर्णयान्वये क्षय व कुष्ठरुग्णांना एसटीच्या प्रवास भाड्यात सवलत लागू केली आहे. त्यानुसार उपचारासाठी जाण्या-येण्याकरिता क्षय रुग्णांना प्रवास भाड्यात ५० टक्के, तर कुष्ठरुग्णांना ७५ टक्के सवलत दिली जाते. अशीच सवलत एचआयव्हीबाधित रुग्णांनाही मिळावी, ही जुनी मागणी आहे.एचआयव्हीबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. गावागावांतून हे रुग्ण महिन्यातून एकदा एड्स प्रतिबंधक कक्षामध्ये औषधोपचारासाठी येतात. या आजाराने आई-वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर अनाथ झालेल्या अनेक मुलांनाही औषधोपचारासाठी जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करावी लागते. त्यांचा खर्च नातेवाईकही करायला तयार नसतात. अनेक रुग्ण एचआयव्हीच्या धास्तीनेच खचून जातात आणि प्रवासभाड्याचा खर्च टाळण्यासाठी औषधोपचाराकडेही दुर्लक्ष करतात. त्यांना सवलत दिल्यास त्यांना औषधोपचार घेणे शक्य होईल, असे निरीक्षण संस्थांनी नोंदविले आहे. (प्रतिनिधी)एचआयव्हीबाधितांची संख्या एक लाखावरराज्यातील एकूण एचआयव्हीबाधित रुग्णांपैकी एआरटी (एड्स पुनर्वसन आणि उपचार) केंद्रांकडे २ लाख १६ हजार १३७ रुग्णांची नोंदणी असून, त्यापैकी १ लाख ५६ हजार ८३६ रुग्ण नियमितपणे औषधोपचारासाठी येतात. या रुग्णांना सवलत मिळाल्यास औषधोपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढण्यास मदत होईल. गुजरातमध्ये दिली जाते खर्चाची रक्कमगुजरातमध्ये एचआयव्हीबाधित रुग्णांना प्रवासापोटी रोख रक्कम दिली जाते. एआरटी केंद्रांमध्ये रुग्ण औषधोपचारासाठी आल्यानंतर त्याने प्रवास भाड्याचे तिकीट दाखविल्यास या केंद्राद्वारे लगेच त्याला रोख रक्कम दिली जाते. गुजरातप्रमाणेच महाराष्ट्रातही अशी व्यवस्था केली, तर रुग्णांना दिलासा मिळू शकतो.एआरटी सेंटरपर्यंत येण्यासाठी रुग्णांना प्रवास सवलत दिली पाहिजे. यासाठी राज्य शासनाकडे, तसेच एसटी महामंडळाकडेही पाठपुरावा सुरू आहे.- गजानन देशमुख प्रकल्प समन्वयक, जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष, बुलडाणा