शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

कीर्तनातून नदी स्वच्छतेबाबत प्रबोधन करणे गरजेचे - लोणीकर

By admin | Updated: May 13, 2016 19:50 IST

चंद्रभागा नदीचे पावित्र्य राखण्यासाठी शासनाने नमामी चंद्रभागा हा कार्यक्रम हाती घेतला आहे

ऑनलाइन लोकमतपंढरपूर, दि. 13- चंद्रभागा नदीचे पावित्र्य राखण्यासाठी शासनाने नमामी चंद्रभागा हा कार्यक्रम हाती घेतला आहे. नदी स्वच्छ ठेवण्यासाठी शासन राबवित असलेल्या या उपक्रमात सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. यासाठी वारकऱ्यांनी नदी स्वच्छतेबाबत त्यांच्या कीर्तनातून प्रबोधन करावे असे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. चंद्रभागा नदी स्वच्छतेबाबत पाणी पुरवठा मंत्री लोणीकर यांनी येथील अर्बन बँकेच्या सभागृहात प्रमुख वारकऱ्यांसमवेत चर्चा केली यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री विजय देशमुख, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव संतोषकुमार, आमदार प्रशांत परिचारक, आमदार सुभाष देशमुख, नगराध्यक्षा साधना भोसले, राजन पाटील, वारकरी संप्रदायाचे प्रकाश बोधले, माऊली महाराज, रामभाऊ मोरे, ॲड. संपतराव चव्हाण, वा. ना. उत्पात, कैकाडी महाराज यांच्यासह अन्य वारकरी महाराज उपस्थित होते.पाणी पुरवठा मंत्री लोणीकर म्हणाले, पंढरपूरात येणारा वारकरी चंद्रभागा नदीचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करत असल्याने ते पवित्र व स्वच्छ असणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने नमामी चंद्रभागा हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमासाठी लागणारा आवश्यक निधी शासन उपलब्ध करुन देणार आहे. तीर्थक्षेत्रांची ठिकाणी स्वच्छ व पवित्र ठेवण्यासाठी शासन योजना राबवित आहे. या योजना केवळ शासनाच्या न राहता त्या लोकांना आपल्या वाटाव्यात आणि नदी स्वच्छ, पवित्र राहण्यासाठी त्यांनीही आपले योगदान द्यावे यासाठी त्यांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. आणि प्रबोधनाचे हे काम वारकरी त्यांच्या कीर्तनातून चांगल्या प्रकारे करु शकतात असेही पाणी पुरवठा मंत्री लोणीकर यावेळी म्हणाले. नदीचे पाणी दुषित होऊ नये यासाठी नमामी चंद्रभागा या कार्यक्रमातून चंद्रभागा नदीचे शुध्दीकरण करताना नदीकाठी घाट बांधण्याबरोबरच दशक्रिया विधीसारख्या धार्मिक कार्यक्रमासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. नदीत येणारे सांडपाणी अडवून त्यावर प्रक्रिया करुन हे पाणी शेती किंवा उद्योगाला देण्यात येणार आहे. पंढरपूरच्या विकासासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन दिला जाईल असल्याचेही पाणी पुरवठा मंत्री लोणीकर यांनी सांगितले. पालकमंत्री देशमुख म्हणाले, नदी स्वच्छतेसाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा असून वारकऱ्यांनीही या कामात आपले योगदान द्यावे. नदी स्वच्छतेचे हे पवित्र काम सर्वांच्या सहकार्यातून हे काम यशस्वी होणार आहे. यावेळी प्रकाश बोधले, जळगांवकर महाराज, रामभाऊ मोरे, ॲड. संपतराव चव्हाण, वा. ना. उत्पात, कैकाडी महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त केले. चंद्रभागा नदीचे पावित्र राखण्यासाठी शासनाने नमामी चंद्रभागा हा उपक्रम सुरु केल्याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले.