शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

जाती निर्मूलनाच्या लढाईची पुन्हा गरज

By admin | Updated: November 10, 2014 00:59 IST

जातीभेद हा देशाला लागलेला एक कलंक आहे. परंतु सध्या जातीनिर्मूलनाचे काम फारसे होताना दिसून येत नाही. उलट जातीच्या राजकारणाला अधिक वाव दिला जात आहे. जाती कशा मजबूत होतील

ज्योती लांजेवार प्रथम स्मृतिदिन : पुष्पा भावे यांचे प्रतिपादन नागपूर : जातीभेद हा देशाला लागलेला एक कलंक आहे. परंतु सध्या जातीनिर्मूलनाचे काम फारसे होताना दिसून येत नाही. उलट जातीच्या राजकारणाला अधिक वाव दिला जात आहे. जाती कशा मजबूत होतील असाच एकूण सर्व प्रकार सुरू आहे, त्यामुळे जाती निर्मूलनाच्या लढाइची पुन्हा एकदा गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन प्रख्यात समीक्षक प्रा. पुष्पा भावे यांनी आज येथे केले. प्रख्यात कवयित्री दिवंगत डॉ. ज्योती लांजेवार यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त डॉ. ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठान नागपूरद्वारा रविवारी विदर्भ हिंदी साहित्य संमेलन सीताबर्डी येथील अर्पण सभागृहात एक दिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राचे उद्घाटन प्रा. पुष्पा भावे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. ज्येष्ठ कवी डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी हे विशेष अतिथी होते. प्रा. पुष्पा भावे पुढे म्हणाल्या, आंबेडकरी विचारांची पोत जपत जातीनिर्मूलनाची चळवळ राबविण्याचे काम दिवंगत डॉ. ज्योती लांजेवार यांनी केले. एखाद्या संमेलनात ज्योती लांजेवार असल्या की बोलणारी पुरुष मंडळी चूप बसायची. आंबेडकरी चळवळीतील समाजकारण-राजकारणाला अखिल भारतीय पातळीवर नेतृत्व पुरविणाऱ्या त्या एक सामाजिक कार्यकर्त्या होत्या. अरुण शौरी यांनी बाबासाहेबांच्या विरोधात केलेल्या उल्लेखाला संयमानं आणि मुद्देसूदपणे उत्तर देण्याचे काम ज्योती लांजेवार यांनी केले होते. आज देशात स्वच्छता अभियानाच्या नावावर मोठा गाजावाजा केला जात आहे. परंतु गांधीजींनी केवळ बाह्य स्वच्छतेबाबतच सांगितले नव्हते. तर आंतरिक मनामध्ये असलेली गढुळताही स्वच्छ करावी, असे सांगितले होते. स्वच्छतेच्या नावावर शब्दांचे राजकारण सुरू आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. अनेक कार्यकर्ते म्हणतात की सध्याचा काळ कठीण आहे. परंतु या कठीण काळातच काम करण्याची खरी गंमत असते. चळवळीत काम करणाऱ्यांनी आज खऱ्या अर्थाने सजगपणे राहून अपला शत्रू कोण आहे, हे ओळखून अतिशय संयमाने ही चळवळ पुढे नेण्याची गरज आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी म्हणाले, आपली संस्कृती व भारतीय वातावरणाची पेरणी ही ज्योती लांजेवार यांच्या कवितेचे मर्म होते. ज्योती लांजेवार या परिवर्तनवादी चळवळीच्या पाईक होत्या. डॉ. लांजेवार यांचे प्रतिष्ठान हे वैचारिक परिवर्तनाची शाळा व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी डॉ. अनिल नितनवरे संपादित डॉ. ज्योती लांजेवार यांच्या कवितांच्या ‘पोस्टर पोएट्री’चे तसेच संगीता महाजन यांच्या डॉ. ज्योती लांजेवार यांच्या कवितांवरील फोटो -पोएट्री’चे प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्याचे उद्घाटन सुद्धा प्रा. पुष्पा भावे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. अपर्णा लांजेवार-बोस यांनी प्रास्ताविक केले. अजय गंपावार यांनी संचालन केले. प्रसेनजित गायकवाड यांनी आभार मानले. डॉ. अजय चिकाटे, डॉ. विलास वाघ, शैल जैमिनी, डॉ. अशोक भस्मे, सुनिता झाडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)