शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘एफआरपी’चा कायदा बदलण्याची गरज

By admin | Updated: October 27, 2015 02:03 IST

शेतकऱ्यांना ऊसगाळप झाल्यानंतर १४ दिवसांत एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यानुसार एफआरपी द्यावी लागेल, असा सरकार म्हणून आमचा आग्रह असला

मुंबई / कोल्हापूर : शेतकऱ्यांना ऊसगाळप झाल्यानंतर १४ दिवसांत एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यानुसार एफआरपी द्यावी लागेल, असा सरकार म्हणून आमचा आग्रह असला, तरी ती दोन-तीन टप्प्यांत कारखाने देणार असतील व त्यास शेतकऱ्यांनी वार्षिक सभेत मंजुरी दिली असल्यास, त्यासही सरकार हरकत घेणार नाही. यंदाच्या हंगामात तोच या प्रश्नातील मध्यम मार्ग असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी स्पष्ट केले. वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील ‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी ‘लोकमत’च्या संपादकीय चमूशी दिलखुलास गप्पा मारल्या. या गप्पांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यभरातील संपादकीय सहकारीही सहभागी झाले होते. त्यावेळी यंदाच्या हंगामातील कोंडी सरकार कसे फोडणार, या विषयीच्या प्रश्नास त्यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले. मुख्यमंत्री म्हणाले, ‘एफआरपी’चा कायदा हा केंद्रातील काँग्रेस सरकारच्या काळातील आहे. तो आम्ही केलेला नाही. त्या कायद्यानुसार एफआरपी एकरकमी देणे बंधनकारक आहे, परंतु हा कायदा करताना त्यामध्ये एक मूलभूत चूक झाली आहे. उसाचा भाव गृहितकावर निश्चित केला जातो. तो बाजारातील साखरेचा भावाशी निगडित नाही. कोणत्याही अंतिम उत्पादनाच्या किमतीपेक्षा त्याच्या कच्च्या मालाची किंमत जास्त असू नये, एवढे किमान तत्त्वही पाळले गेलेले नाही. त्यामुळेच गेली दोन-तीन वर्षे एफआरपीचा गुंता निर्माण होत आहे. गतवर्षी बाजारातील साखरेचा भाव ३३०० रुपये क्विंटल असा गृहित धरून, त्यानुसार ऊसाची ‘एफआरपी’ निश्चित करण्यात आली, ती सरासरी २४०० रुपये होती. बाजारात प्रत्यक्षात साखरेचा भाव मात्र १९०० रुपयांपर्यंत खाली आला होता. पुढील वर्षी एफआरपीमध्ये आणखी शंभर रुपयांची वाढ करण्यात आली आहे.देशात सर्वाधिक ९१ टक्के एफआरपी देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. महाराष्ट्रातील साखर कारखानदारी चांगली आहे व तिच्यावर सरकारचा वचक आहे, याचाच हा परिणाम आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ‘यंदाही एफआरपीचा प्रश्न निर्माण झाला आहे.’ शेतकरी हा कारखान्याचा मालक आहे. त्यामुळे वार्षिक सभेत ठराव करून दोन-तीन टप्प्यांत एफआरपी घेण्यास त्यांची तयारी असेल, तर सरकारला त्याबद्दल हरकतीचे कारण नाही. कायद्याने ती एकरकमी देणे बंधनकारकच असेल असे मत आहे, परंतु मधला मार्ग म्हणून हा विचार करावा लागेल. राज्यात काही कारखान्यांनी असे प्रयोग यंदा केले आहेत. (प्रतिनिधी)