शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅट्रॉसिटी कायदा आवश्यक: सुशीलकुमार शिंदे

By admin | Updated: July 28, 2016 20:30 IST

समाजात अस्पृश्यता अद्याप कमी झालेली नसून जातपात मानली जाते. दलितावर हल्ले होत आहेत. अशात अ‍ॅट्रॉसिटी रद्द करण्याची मागणी चुकीची आहे

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. २८ : समाजात अस्पृश्यता अद्याप कमी झालेली नसून जातपात मानली जाते. दलितावर हल्ले होत आहेत. अशात अ‍ॅट्रॉसिटी रद्द करण्याची मागणी चुकीची आहे, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे बोलताना व्यक्त केले. महापालिकेने शिंदे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त तिसऱ्यांदा मानपत्र देऊन सत्कार करण्याचा ठराव केला होता. त्यानुसार तयारी सुरू होती. प्रशासनाने कार्यक्रमास राष्ट्रपती येणार म्हणून दीडी कोटीचा खर्चाचा विषय सभेकडे मंजुरीसाठी पाठविला होता. याला भाजपा—सेनेच्या सदस्यांनी विरोध केला होता. सभेत यावर वादळी चर्चा होऊन हा विषय दप्तरी दाखल करून सर्वांनुमते सत्कार करण्याचे ठरले होते.

या पार्श्वभूमीवर शिंदे गुरूवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. काँग्रेसभवनमध्ये सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी महापालिकेचा सत्कार नाकारला. डी. वाय. पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीचाच सत्कार मी स्वीकारणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यानंतर पत्रकारांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करण्याबाबत केलेल्या मागणीकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की ही मागणी चुकीची आहे. अ‍ॅट्रॉसिटीचा कायदा आवश्यक आहे. उलट अलिकडच्या काळात जातीयवादी शक्ती डोके वर काढत असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

काश्मीरमध्ये केंद्र शासन अपयशीसत्तेवर आल्यावर दहशतवाद थांबवू म्हणणाऱ्या मोदी सरकारवर शिंदे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना टीका केली. काश्मीरमध्ये सध्या काय चालले आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. ४५ जणांचा बळी जातो. इतर देश पर्यटकांना काश्मीरमध्ये जाऊ नका म्हणून सांगत आहेत. हे कशाचे द्योतक आहे. दहशतवाद्यावर आम्हीही कारवाया केल्या पण सगळे जपून चालले होते. या सरकारला फक्त प्रसिद्धी हवी आहे, यांचे परराष्ट्र धोरण कुठे आहे असा सवाल शिंदे यांनी केला. राज्य व देशातील दलितांवरील अत्याचाराबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.