शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात नदयांच्या राष्ट्रीयीकरणास राष्ट्रवादी काँग्रेसचाही तीव्र विरोध

By admin | Updated: September 30, 2016 18:45 IST

राज्यातील नद्यांच्या राष्ट्रीयीकरणास राष्ट्रवादी काँग्रेसनेही विरोध दर्शविला असून या प्रश्नावर गोवा फॉरवर्डबरोबर राहू, असे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी जाहीर केले आहे.

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. ३० : राज्यातील नद्यांच्या राष्ट्रीयीकरणास राष्ट्रवादी काँग्रेसनेही विरोध दर्शविला असून या प्रश्नावर गोवा फॉरवर्डबरोबर राहू, असे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी जाहीर केले आहे. या प्रकरणी केंद्रीय जहाजोद्योगमंत्री नितीन गडकरी यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला.

पत्रकार परिषदेत डिसोझा म्हणाले की, यामुळे मच्छिमार संकटात येतील तसेच अंतर्गत जलवाहतुकीवरही निर्बंध येतील. १८२ किलोमिटरचा नदी किनारी तटही केंद्र सरकारच्या अखत्यारित जाईल. मुरगांव पोर्ट ट्रस्टने आधीच बेतुल ते काणकोणपर्यंत सागरी कब्जा केला आहे. वास्कोत तर किनाऱ्यावर कोणतेही काम करायचे झाल्यास एमपीटीची परवानगी आधी घ्यावी लागते. अनेकदा एमपीटी आडमुठे धोरण घेते. आता तर राज्यातील सहा नद्या एमपीटीच्या ताब्यात जातील त्यामुळे लोकांना त्याचा बराच त्रास होणार आहे.

गोवा फॉरवर्डने या प्रश्नावर समविचारी पक्षाने एका व्यासपीठावर येण्याची जी हाक दिली आहे त्यास राष्ट्रवादीने प्रतिसाद दिला असून आंदोलन उभरायचे झाल्यासही पक्ष गोवा फॉरवर्डबरोबर असेल, असे डिसोझा यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, दुरुस्ती विधेयक आणून सरकारने माड कापण्यासाठी मार्ग मोकळा केला, जमिनीही लाटल्या आता नद्याही आंदण द्यायला निघाले आहे. एमपीटीने मुरगांव बंदरात कोणतेही परवाने न घेता गाळ उपसण्याचे काम हाती घेतले तेव्हा राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेऊन स्थगिती आणावी लागली. नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाबाबत सर्व संबंधित घटकांना विश्वासात घेणार असे आश्वासन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी विधानसभेत दिले होते ते पाळलेले नाही. नद्यांचे राष्ट्रीयीकरण करुन खाजगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.

नितीन गडकरींवर आरोप दरम्यान, पक्षाचे सरचिटणीस अविनाश भोसले यांनी केंद्रीय जहाजोद्योगमंत्री नितीन गडकरी यांच्यावर हल्लाबोल करताना हे ह्यआर्थिक राजकारणह्ण असल्याचा आरोप केला. महाराष्ट्रात उड्डाणपुलांच्या बाबतीत भ्रष्टाचार केल्याचा संशय असलेलेच आता गोव्यात स्वार्थासाठी नद्यांचे राष्ट्रीयीकरण करण्यास पुढे सरसावले आहेत, असे भोसले म्हणाले. गोमंतकीय जनतेला विश्वासात न घेताच हा घाट घालण्यात आला, अशी टीका त्यानी केली. पत्रकार परिषदेस देवानंद नाईक, अभिजित धारगळकर, जॉर्ज बार्रेटो आदी पदाधिकारीही उपस्थित होते.