शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीची वेगळी चूल

By admin | Updated: December 18, 2015 02:42 IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, असे म्हणत गुरुवारी राष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन केले.

-  अतुल कुलकर्णी,  नागपूरशेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, असे म्हणत गुरुवारी राष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन केले. राष्ट्रवादीने मांडलेली वेगळी चूल लक्षात येताच काँग्रेसचे सदस्य धावपळ करत पायऱ्यांवर पोहोचले पण तोपर्यंत राष्ट्रवादीने आंदोलन गुंडाळून सभागृहात जाणे पसंत केले. विरोधकांमधील दुफळी समोर येऊ नये म्हणून कर्जमाफीच्या विषयावर दोन्ही पक्षाच्या सदस्यांनी राज्यपालांना जाऊन भेटायचे आणि निवेदन देण्याचा निर्णय घेतला गेला. दुपारी कामकाज चालू असतानाच दोन्ही सभागृहातील प्रमुख नेते राज्यपालांच्या भेटीला गेले. त्यावेळी विधानपरिषदेचे कामकाज बंद ठेवण्यात आले,पण विधानसभेत कामकाज बंद पाडणे विरोधकांंना शक्य झाले नाही. शेतकरी आत्महत्या, दुष्काळ या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरावर राष्ट्रवादीच्या नेत्यांना बोलायचे असतानाही बुधवारी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभात्याग करतो असे घोषित केले. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, जयंत पाटील यांनाही बोलायचे होते. सभात्यागाची घोषणा झाल्यानंतर काहीवेळ राष्ट्रवादीचे नेते सभागृहात रेंगाळले मात्र शेवटी तेही नाईलाजाने बाहेर पडले. राष्ट्रवादीच्या नेत्यांची नंतर वेगळी चर्चा झाली आणि सकाळी काँग्रेसला न घेता आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.अजित पवार, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांनी सकाळीच पायऱ्यांवर बैठक मारत, घोषणाबाजी सुरु केली. या आंदोलनाची माहिती कळताच काँग्रेसचे नेते पायऱ्यांकडे गेले पण तोपर्यंत राष्ट्रवादीचे आंदोलन अशा बातम्या सुरु झाल्या होत्या. पायऱ्यांवर जमलेल्या पत्रकारांकडे राष्ट्रवादीचे काही नेते कालच्या प्रकाराबद्दल जाहीर नाराजी व्यक्त करत होते. विधानपरिषदेचे कामकाज पहा आणि विधानसभेतला विरोधी पक्ष नेत्यांचे काम पहा, तुम्हीच तुलना करा, असेही काही ज्येष्ठ सदस्य बोलून दाखवत होते. नंतर मात्र दोन्ही काँग्रेसचे सदस्य सदस्य राज्यपालांना जाऊन भेटले.