शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसचा आता तीन मतदारसंघावर दावा

By admin | Updated: June 8, 2014 00:05 IST

राष्ट्रवादी काँग्रेसने अकोला जिल्‘ातील मूर्तिजापूर या हक्काच्या विधानसभा मतदारसंघासह आता आकोट आणि अकोला पूर्व या दोन मतदारसंघावरही दावा केला आहे.

अकोला- राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्‘ातील मूर्तिजापूर या हक्काच्या विधानसभा मतदारसंघासह आता आकोट आणि अकोला पूर्व या दोन मतदारसंघावरही दावा केला आहे. शनिवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये जिल्‘ातील पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी हा प्रस्ताव ठेवला. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी शरद पवार यांनी जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकार्‍यांची शनिवारी बैठक बोलाविली होती. या बैठकीला महानगर आणि ग्रामीण कार्यकारिणीचे पदाधिकार्‍यांसोबतच युवक आघाडीचे पदाधिकारीसुद्धा उपस्थित होते. या बैठकीत शरद पवार यांनी सर्व पदाधिकार्‍यांचे म्हणणे ऐकून घेतले. जिल्‘ात कोणत्या पक्षाचे बळ आहे, सध्या राष्ट्रवादी लढवित असलेल्या जागांव्यतिरिक्त आणखी कुठे जागा वाढवून घेता येईल, पक्ष बांधणीच्या दृष्टिकोणातून कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, या सर्व बाबींवर सांगोपांग चर्चा झाली. मूर्तिजापूर या राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघासोबत पक्षाचे प्राबल्य आकोट आणि अकोला पूर्व मतदारसंघात असल्याचा दावा उपस्थित पदाधिकार्‍यांनी केला. काँग्रेसला या मतदारसंघातून केवळ राष्ट्रवादीमुळे आघाडी मिळत असल्याचे पदाधिकार्‍यांनी सांगून या दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचे सांगितले. या बैठकीला जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे पाटील, महानगर अध्यक्ष अजय तापडिया, डॉ. संतोष कोरपे, माजी आमदार तुकाराम बिरकड, महानगराचे कार्याध्यक्ष सरफराज खान, महिला आघाडीच्या अध्यक्ष प्रतिभा अवचार, राजीव बोचे, वासुदेव बोळे, युवक आघाडीचे सचिन वाकोडे, नितीन झापर्डे, प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य सिमांत तायडे, आतिष महाजन यांच्यासह सर्व तालुका प्रमुख आणि जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य या बैठकीला उपस्थित होते. 

** निमंत्रणच नाहीमुंबई आयोजित राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी जिल्‘ातील पदाधिकार्‍यांना आमंत्रित करण्यात आले होते. शहर आणि ग्रामीणच्या अध्यक्षांसोबतच काही प्रमुख पदाधिकार्‍यांना पक्षाकडून थेट निमंत्रण मिळाले. या पदाधिकार्‍यांनी कार्यकारिणीच्या प्रमुख पदाधिकारी व जिल्‘ातील प्रमुख नेत्यांना निमंत्रित करणे अपेक्षित होते. मात्र, कुणालाही निमंत्रण देण्यात आले नाही. त्यानंतरही जिल्‘ातून ३५ पेक्षा अधिक पदाधिकारी उपस्थित होते.