शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

राष्ट्रवादीला शहाणपण, केलेली चूक सुधारली

By admin | Updated: September 22, 2014 02:35 IST

भाजपाशी सलगी करून गेली अडीच वर्षे काही जिल्हा परिषदांमध्ये सत्तेत वाटा मिळविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने रविवारी अखेर आपली चूक सुधारत अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला साथ दिली.

यदु जोशी, मुंबईभाजपाशी सलगी करून गेली अडीच वर्षे काही जिल्हा परिषदांमध्ये सत्तेत वाटा मिळविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने रविवारी अखेर आपली चूक सुधारत अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला साथ दिली. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जागा वाढवून हव्या असलेल्या राष्ट्रवादीने हे शहाणपण दाखविले. रविवारीही भाजपाला साथ दिली असती तर काँग्रेसच्या रोषाचा सामना करावा लागला असता आणि जागा वाटपाच्या बोलणीवर त्याचा विपरीत परिणाम झाला असता म्हणून घड्याळाने पंजाची सोबत केल्याचे म्हटले जाते. भाजपाशी असलेली अभद्र युती तोडा, असे काँग्रेसने राष्ट्रवादीला वारंवार सांगितले होते. राष्ट्रवादीच्या बंडखोरीवर काँग्रेसने बारीक नजर ठेवली होती आणि यावेळी दगाफटका दिला तर त्याचा परिणाम आघाडीवर होऊ शकेल, असे सूचित केल्याने राष्ट्रवादीने भाजपापासून अंतर राखले, असे स्पष्ट दिसते. दुसरे म्हणजे राष्ट्रवादीने कमळाला हात दिला असता तर जातीयवादी पक्षांसोबत असल्याचा प्रचार विधानसभा निवडणुकीत त्यांच्यावर झाला असता. हे टाळण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने भाजपाशी असलेली युती तोडली असे म्हटले जात आहे. उपराजधानी नागपुरात भाजपाची साथ राष्ट्रवादीने सोडली खरी पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गडात भाजपाला सत्तेपासून रोखण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला अपयश आले. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि अमरावती या पाचही जिल्हा परिषदांत राष्ट्रवादीने भाजपाशी फारकत घेतली. तरीही नागपूर, चंद्रपूरमध्ये पुन्हा भाजपाने कब्जा मिळविला. गडचिरोलीत राष्ट्रवादीला अध्यक्षपद मिळाले तर काँग्रेसला उपाध्यक्षपद. चंद्रपुरात राष्ट्रवादीने (पान ४ वर)