शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ऐरोलीत राष्ट्रवादीच्या नगरसेविकेला मारहाण

By admin | Updated: October 22, 2014 05:59 IST

दिघा येथील प्रभाग ४ च्या नगरसेविका अ‍ॅड. अपर्णा गवते मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ऐरोली सेक्टर ८ येथील ‘डी मार्ट मॉल’मध्ये खरेदीसाठी गेल्या होत्या

नवी मुंबई : राष्ट्रवादीच्या नगरसेविका अ‍ॅड. अपर्णा गवते यांना मारहाण झाल्याची घटना ऐरोली येथे घडली आहे. तीन अज्ञात तीन महिला व दोन पुरुषांनी हा हल्ला केला आहे. त्यापैकी एका महिलेला अटक करण्यात अली असून, अनिता बाराते असे तिचे नाव आहे. दिघा येथील प्रभाग ४ च्या नगरसेविका अ‍ॅड. अपर्णा गवते मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ऐरोली सेक्टर ८ येथील ‘डी मार्ट मॉल’मध्ये खरेदीसाठी गेल्या होत्या. रस्त्यालगत गाडी उभी करून त्या मॉलमध्ये जात असतानाच तीन अज्ञात महिलांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना वाचवण्यासाठी त्यांचे कारचालक बुद्धेश गौडा धावून गेले. परंतु या वेळी तेथेच उभ्या असलेल्या दोन व्यक्तींनी गौडा यांनाही मारहाण केली. त्यापैकी एकाकडे पिस्तूल होते, असे गवते यांचे म्हणणे आहे. अखेर गवते यांचा मुलगा अथर्व याने ओरडून नागरिकांना मदतीसाठी बोलावले. त्यामुळे मारहाण करणाऱ्या महिला व पुरुषांनी तेथून पळ काढला. त्यापैकी एका महिलेला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. अनिता बाराते असे या महिलेचे नाव असून ती उल्हासनगरची रहिवासी आहे, तर पळून गेलेले इतरही उल्हासनगरचेच आहेत. त्यांच्यावर रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख गोजरे यांनी सांगितले. या प्रकारानंतर अपर्णा गवते यांची पालिका रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना फोर्टीस रुग्णालयात दाखल केले आहे. परंतु या हल्ल्यामागचे कारण अद्याप स्पष्ट नसल्याचे अपर्णा गवते यांचे पती नगरसेवक नवीन गवते यांनी सांगितले. (प्रतिनिधी)