शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयीकृत बँकांत आता विभागवार संपाचा पायंडा

By admin | Updated: October 17, 2014 22:52 IST

१२ नोव्हेंबरला देशभरात संप : २ ते ५ डिसेंबरला चार ठिकाणी विभागवार संप; ३० नोव्हेंबरला निदर्शने

रमेश पाटील- कसबा बावडा -- विविध मागण्यांसाठी राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत अनेकवेळा संप केले, निदर्शने केली; परंतु व्यवस्थापनाने या संपाची फारशी गंभीर दखल घेतली नाही. त्यामुळे आता बँक कर्मचाऱ्यांनी ‘इफेक्टिव्ह’ संप होण्यासाठी संपाची स्टाईल बललली आहे. एकाच दिवशी, एकाचवेळी देशभर संप करण्याऐवजी विभागवार संप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २ ते ५ डिसेंबरला असा सलग चार दिवस विभागवार संप होणार आहे. संप जरी उत्तर भारत, दक्षिण भारत, पूर्व भारत आणि पश्चिम भारत असा वेगवेगळ्या ठिकाणी झाला तरी त्याचा देशभरातील ग्राहकाच्या व्यवहारावर मात्र फार मोठा परिणाम होऊ शकतो.२५ टक्के पगारवाढ करावी या मागणीचे निवेदन ३० आॅक्टोबर २०१२ रोजी संघटनांनी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाला दिले होते. आता या मागणीला दोन वर्षे होऊन अद्याप समाधानकारक तोडगा व्यवस्थापनाने काढला नसल्याचा दावा संघटनांचा आहे. याचाच एक भाग म्हणून १० आॅक्टोबरला कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. त्यानंतर १३ तारखेपासून नियमानुसार काम सुरू केले. आता तर १२ नोव्हेंबरला संपूर्ण देशभरात एकाचवेळी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. या संपात देशभरातील नऊ संघटनांचे सुमारे १० लाखांहून अधिक कर्मचारी सहभागी होणार आहेत. तसेच या संपानंतर ३० नोव्हेंबरला बँकांच्या विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करून व्यवस्थापकांच्या कारभाराविरुद्ध घोषणा देण्यात येणार आहेत. १२ नोव्हेंबरला एक दिवसाचा संप झाल्यानंतर २ डिसेंबरपासून पुन्हा विभागवार संप सुरू होणार आहेत. २ डिसेंबरला संपूर्ण दक्षिण भारतात एक दिवसाचा संप होणार आहे. त्यावेळी देशभरातील इतर विभागांत मात्र बँकांचे कामकाज सुरू राहणार आहे. मात्र, एका विभागात संप असला आणि दुसऱ्या विभागातील बँका सुरू असल्या तरी त्याचा इफेक्ट हा काही प्रमाणात ग्राहकांच्या व्यवहारावर होणार आहे. याचे उदाहरण द्यायचे झाले तर एखाद्या दक्षिण भारतातील ग्राहकाने उत्तर भारतातील बँकेत खाते असलेल्या कंपनीबरोबर आॅनलाईन व्यवहार करायचा म्हटले तरी हा व्यवहार त्यावेळी उत्तर भारतात संप असल्यामुळे पूर्ण होऊ शकणार नाही. म्हणजेच दक्षिण भारतातील बँकांचा संप नसतानासुद्धा उत्तर भारतातील बँकांचा संप असल्याने व्यवहार न झाल्याने त्याचा फटका ग्राहकाला बसणार आहे.अशा पद्धतीने बँका सलग चार दिवस बंद रहाणार आहेत. त्यानुसार ३ डिसेंबरला उत्तर भारतात, ४ डिसेंबरला पूर्व भारतात, तर ५ डिसेंबरला पश्चिम भारतात संप करण्यात येणार आहे. २५ टक्के पगारवाढ करावी, नोकरभरती करावी, पाच दिवसांचा आठवडा करावा, कार्पोरेट थकबाकीदारांवर कारवाई करावी, आदी मागण्यांसाठी हा संप करण्यात येणार आहे.‘विड्रॉल आॅफ एक्स्ट्रा को-आॅपरेशन’व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने सोमवारी, दि. १३ आॅक्टोबरपासून सर्वच बँकांत ‘विड्रॉल आॅफ एक्स्ट्रा को-आॅपरेशन’ सुरू करण्यात आले आहे. विड्रॉल आॅफ एक्स्ट्रा को-आॅपरेशन म्हणजे नियमानुसार काम करणे. जादा काम न करणे, जास्त वेळ बँकांत न थांबणे, पेंडिंग काम पूर्ण करण्यासाठी सुटीदिवशी बँकांत काम करण्यासाठी न येणे.