शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा शिक्षणाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल

By admin | Updated: August 1, 2016 22:16 IST

शाळा सुरू होऊन एक महिना उलटल्यानंतरही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेश उपलब्ध झाला नाही. सर्व शिक्षा अभियानाच्या नियमानुसार गणवेश

ऑनलाइन लोकमत
 
नागपूर, दि. १ -  शाळा सुरू होऊन एक महिना उलटल्यानंतरही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेश उपलब्ध झाला नाही. सर्व शिक्षा अभियानाच्या नियमानुसार गणवेश खरेदीचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला असतानाही शिक्षण विभागाक डून ठराविक कंत्राटदाराकडूनच खरेदी करावी, असे मौखिक आदेश मुख्याध्यापकांना मिळत आहेत. गणवेश खरेदीत शिक्षण विभाग भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शिक्षण अधिकारी प्राथमिक यांच्या कार्यालयावर हल्लाबोल करीत कार्यालयातील खुर्ची व नेमप्लेटची तोडफोड करून, शिक्षण अधिकाºयांना घेराव केला. 
 
राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात जि.प. च्या एकूण १५६४ शाळा आहेत. यापैकी तब्बल ५६७ शाळांमध्ये अद्यापही गणवेश वाटप झाले नाही.  एकाच ठिकाणावरून खरेदी करण्याची सक्ती केल्याने विद्यार्थ्यांना एकाच वेळी गणवेश मिळू शकला नाही. ही वस्तुस्थिती असताना शिक्षण विभाग कोणतीही चौकशी करण्यास तयार नाही. याचा जाब विचारण्याकरिता सलिल देशमुख व विशाल खांडेकर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. परंतु लोखंडे हे आपल्या कार्यालयास कुलूप लावून गायब होते. यामुळे रायुकाँचे कार्यकर्ते आक्रमक झाले. जोरदार नारेबाजी केली. तसेच खुर्च्यांची फेकाफेक केली. यामुळे येथे तणाव निर्माण झाला होता.