शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पक्षांतर प्रकरणाची राष्ट्रवादीकडून दखल

By admin | Updated: September 18, 2016 00:30 IST

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेले नगरसेवकाचे पक्षांतर राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलेच खटकले आहे

पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेले नगरसेवकाचे पक्षांतर राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलेच खटकले आहे. ‘काही अडचणी असतील तर माझ्याशी बोला, ते होत नसेल तर खासदार सुप्रिया सुळे व तेही जमत नसेल तर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही तुम्ही बोलू शकता,’ असे सांगून थेट नाव न घेता पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना चुचकारले.निवडणुकीसंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी पवार यांच्या उपस्थितीत एका हॉटेलमध्ये नगरसेवक, विभागीय अध्यक्ष तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण, महापौर प्रशांत जगताप, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृह नेते बंडू केमसे, पक्षप्रवक्ते अंकुश काकडे आदी या वेळी उपस्थित होते. सर्वेक्षणात पक्षाचीच सत्ता येणार, असे निष्कर्ष निघाले आहेत; मात्र फाजील आत्मविश्वास पराभव करू शकतो. १०० जागा मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवा. पिंपरी-चिंचवडप्रमाणे एकहाती सत्ता आली पाहिजे, असे पवार यांनी बजावले. मतभेद गाडून टाका; त्यामुळे फक्त पक्षाचे व वैयक्तिकही नुकसानच होते, असे ते म्हणाले.पक्षाचा जाहीरनामा कसा असावा, यावरही बैठकीत चर्चा झाली. विविध नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी आपापली मते व्यक्त केली. पक्षाची बैठक संपली, की लगेचच माध्यमांना त्याची माहिती जाते. असे कोण करते त्याची माहिती मला आहे. त्यामुळे हे करू नका. पक्षात दुफळी असल्याचे चित्र निर्माण झाले, तर त्याचा फायदा विरोधक घेतात. त्यामुळे आतल्या गोष्टी आतच ठेवा, असा सल्ला त्यांनी दिला.