शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील ८२ हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड?

By admin | Updated: July 29, 2016 17:52 IST

राष्ट्रीय आरोग्य अभियान ३१ मार्च २०१७ नंतर सुरू राहील अथवा नाही, याबाबत केंद्र सरकारने सुस्पष्ट सूचना दिलेल्या नाहीत.

केंद्र सरकारची गाईडलाईन नाही : मार्च २०१७ पर्यंत कंत्राटपद्धतीने करारअमरावती, दि. २९ : राष्ट्रीय आरोग्य अभियान ३१ मार्च २०१७ नंतर सुरू राहील अथवा नाही, याबाबत केंद्र सरकारने सुस्पष्ट सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे राज्यातील ८२ हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याचे संकेत आहेत.राष्ट्रीय आरोग्य अभियान केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली सुरूआहे. यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर स्वतंत्र कार्यालये स्थापिन करण्यात आले असून या अभियानावर जिल्हा शल्य चिकित्सकांचे नियंत्रण आहे. मात्र, हे अभियान राज्यात ३१ मार्च २०१७ नंतर सुरु राहील की नाही? याबाबत अद्यापही स्पष्ट धोरण प्राप्त झाले नाही. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.

अभियान बंद झाल्यास सार्वजनिक आरोग्य विभागात अगोदरच शेकडो पदे रिक्त असल्यामुळे आरोग्यसेवेवर मोठा परिणाम जाणवेल, हे वास्तव आहे. राज्यात आरोग्य अभियान हे सन २००५ मध्ये सुरु करण्यात आले. हा टप्पा सन २०१२ मध्ये संपुष्टात आला. या सात वर्षांच्या कालावधीत आरोग्यसेवा सर्वच स्तरावर पुरविण्यात आल्या आहेत. दुसऱ्या टप्पा १ एप्रिल रोजी २०१२ रोजी सुरू झाला असून ३१ मार्च २०१७ रोजी संपुष्टात येणार आहे.

हे अभियान सुरू ठेवायचे की नाही? याबाबत केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहेग. मात्र, केंद्र सरकारकडून या अभियानाबाबत सुस्पष्ट धोरण निश्चित होत नसल्याने ३१ मार्च २०१७ नंतर राष्ट्रीय अभियान गुंडाळले जाते काय? याविषयी कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय अभियानात राज्य, विभाग, जिल्हा व तालुकास्तरावर कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. अभियानात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम समाधानकारक असल्यास त्यांना ११ महिन्यांची पुनर्नियुक्ती दिली जाते.

परंतु सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांचे कंत्राट ३१ मार्च २०१७ रोजी संपुष्टात येणार आहे तर दुसरीकडे या राष्ट्रीय अभियानाचा उद्देश पूर्ण झाल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे या अभियानाला मुदतवाढ मिळेल अथवा नाही? याबाबत संभ्रमाची स्थिती आहे. एखाद्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला ३१ मार्च २०१७ नंतर पुनर्नियुक्ती द्यायची असल्यास त्यासाठी शुद्धिपत्रक काढून द्यावे, अशा सूचना राष्ट्रीय अभियान सहसंचालक संजीव जाधव यांनी दिल्या आहेत.अशी आहे ८२ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्तीराष्ट्रीय आरोग्य अभियानात राज्यात एकूण ८२ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. यात लॅब टेक्निशियन, परिचारिका, फार्मासिस्ट, तालुका अकाऊंटंट, डाटा एन्ट्री आॅपरेटर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा लेखाधिकारी, समूह संघटक असे २२ हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. कामावर आधारित मोबदला पद्धतीने ६० हजार आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. ३१ मार्च २०१७ नंतर पुनर्नियुक्ती न मिळाल्यास यासर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांवर घरी बसण्याची वेळ येईल, असे संकेत आहे.‘‘ राष्ट्रीय आरोग्य अभियानाबाबतचे नवे धोरण प्राप्त झाले नाही. मात्र, तसे काही असल्यास अंमलबजावणी केली जाईल. या अभियानात कंत्राटी पद्धतीने कर्मचारी कार्यरत आहेत.- अरुण राऊत,शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय