शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

‘दशक्रिया’ कादंबरीवरील चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2017 04:59 IST

ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड लिखित ‘दशक्रिया’ कादंबरीवर आधारित चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत.

औरंगाबाद : ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड लिखित ‘दशक्रिया’ कादंबरीवर आधारित चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. ‘चंदेरी पडद्यावर साकारण्यात आलेल्या माझ्या शब्दांचा एवढा मोठा सन्मान होताना पाहून खूप आनंद वाटतोय, अशी प्रतिक्रिया बाबा भांड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.मराठी भाषेतील सर्वाेत्कृष्ट चित्रपट, मनोज जोशी यांना सर्वोत्कृष्ट सहअभिनेता तर संजय कृष्णाजी पाटील यांना पूर्वप्रकाशित साहित्यावर आधारित सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार शुक्रवारी जाहीर झाला. पैठणच्या घाटावर दशक्रिया विधीवर उपजीविका भागविणाऱ्या भानुदास म्हणजेच भान्याची ही गोष्ट. दहा-बारा वर्षांच्या या मुलाच्या निरागस डोळ्यातून समाजात असलेल्या जाती-परंपरा-रुढींचे केलेले अचूक टिपण यामध्ये नोंदविण्यात आले आहे. चित्रपटात दिलीप प्रभावळकर, आदिती देशपांडे, मिलिंद शिंदे, नंदकिशोर चौघुले यांच्या भूमिका असून आर्या आढाव हा बालकलाकार ‘भान्या’च्या मुख्य भूमिकेत आहे. माझी पात्रं जिवंत झाली!लेखक म्हणून शब्दबद्ध केलेली पात्रे पटकथाकार, दिग्दर्शक आणि सर्व कलाकारांनी अतिशय संवेदनशीलपणे साकारून त्यांना जिवंत केले. प्रथम हा चित्रपट पाहिला तेव्हा शब्दरुपी असणारी ही लोकं आज माझ्यासमोर चालू-बोलू लागली होती. आपल्या कलाकृतीला योग्य तो न्याय मिळाला याचे समाधान आहेच, असे ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांनी सांगितले.नवदिग्दर्शकासाठी यापेक्षा मोठी सुरुवात दुसरी काय असू शकते? बाबा भांड यांनी माझ्यावर विश्वास दाखवून ‘दशक्रिया’वर चित्रपट बनविण्याची संधी दिली. संपूर्ण टीमचे हे यश आहे, असे चित्रपटाचा दिग्दर्शक संदीप पाटील म्हणाला. (प्रतिनिधी)>‘लोकमत’ कनेक्शन१९९४ साली ‘लोकमत’च्या रविवार पुरवणीतून बाबा भांड लिखित ‘दशक्रिया घाटावरची मुलं’ ही गोष्ट क्रमश: प्रकाशित झाली होती. त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे १९९५ साली त्यांनी या किशोरकथेला कादंबरीचे स्वरूप देऊन ‘दशक्रिया’ नावाने प्रकाशित केले.>निर्णय योग्य पटकथा वाचल्यानंतर आपण ‘केशव भटा’ची भूमिका करावी हा निर्णय घेतला. आज तो निर्णय सत्कारणी लागला आहे.- मनोज जोशी, अभिनेते