शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

नथुराम गोडसे संघ स्वयंसेवकच - कुटुंबियांचा दावा

By admin | Updated: September 8, 2016 12:37 IST

नथुराम गोडसे यांनी कधीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोडला नव्हता वा त्यांचे कधीही निलंबन झाले नव्हते. ते संघस्वयंसेवक होते' असा दावा गोडसे यांच्या कुटुंबियांनी केला आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ८ - 'नथुराम गोडसे यांनी कधीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोडला नव्हता वा त्यांचे कधीही निलंबन झाले नव्हते. ते संघस्वयंसेवक होते' असा दावा गोडसे यांच्या कुटुंबियांनी केला आहे. ' अखेरच्या काळात त्यांनी संघावर बरीच टीका केली होती, पण तरीही १९३८ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निजामाविरोधात छेडलेल्या आंदोलनात ते इतर स्वयंसेवकांसह सहभागी झाले होते' अशी माहिती नथुराम गोडसे व स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा नातू सात्यकी सावरकर यांनी दिली आहे. ' इकॉनॉमिक टाइम्स'ने हे वृत्त दिले आहे. सात्यकी सावरकर हे हिमानी सावरकर यांचे पूत्र होत. सात्यकी यांचे वडील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बंधू नारायण सावरकर यांचे पूत्र होत. त्यामुळे सात्यकी हे नथुराम गोडसे व स्वातंत्र्यवीर सावरकर या दोघांचे नातू आहेत.
2014 लोकसभा निवडणुकीवेळी भिवंडीतील प्रचारसभेदरम्यान राहुल गांधींनी आरएसएसच्या लोकांनी महात्मा गांधींना गोळ्या घालून हत्या केली असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत संघाने भिवंडी न्यायालयात राहुल गांधीविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला होता. महात्मा गांधी यांची हत्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याबाबत केलेले विधान मागे घेण्यास नकार दिल्यानंतर राहुल गांधींविरोधात हा खटला चालणार असतानाच आता गोडसे यांच्या नातवाच्या या वक्तव्यामुळे राहुल यांना मदत होण्याची चिन्हे दिसत आहेत. 
' आम्ही नथुराम गोडसे व गोपाळ गोडसे यांचे सर्व महत्वपूर्ण लिखाण संग्रहीत केले आहे. त्या लिखाणातून हेच स्पष्ट होते की नथुराम गोडसे हे संघाचे समर्पित कार्यकर्ते होते. मात्र संघाने काही ठिकाणी मवाळ भूमिका घेतल्याने त्यांचे संघासोबत मतभेद झाले'  असे सात्यकी यांनी सांगितले. ' १९३२ साली सांगलीत असताना नथुराम गोडसे यांनी संघात प्रवेश केला. हिंदूंविरोधात होणा-या अत्याचारानंतरही संघ पुरेशी आक्रमक भूमिका घेत नसल्याचे त्यांचे मत होते. मात्र असे असले तरीही १९३८-३९ सालादरम्यान संघाने हैदराबादच्या निजामाविरोधात भाग्यनगर येथे छेडलेल्या 'मुक्तिसंग्रामात' ते सहभागी झाले होते. संघासोबत मतभेद असतानाही ते इतर स्वयंसेवकांच्या खांद्याला खांदा भिडवून या आंदोलनात उतरले होते. हैदराबादमध्ये राहणा-या हिंदूंच्या शोधार्थ राबवण्यात आलेल्या मोहिमेतील स्वयंसेवकाच्या तुकडीत नथुराम याचा समावेश होता. त्यावेळी त्यांनी हैदराबादमधून अनेक लेख पाठवले, ते अनेक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धही झाले होते, ते आम्ही आजही जपून ठेवले आहेत' असेही सात्यकी म्हणाले. 
' १९४२ साली विजयादशमीच्या दिवशी नथुराम यांनी स्वत:  'हिंदू राष्ट्र दल' या संस्थेची स्थापना केली. मात्र त्यांनी हिंदूंसाठी शिबिरे घेणे कायम ठेवले. फाळणीच्या मुद्यावरून १९४६ साली त्यांनी हिंदू महासभेचा राजीनामा दिला. ' असे त्यांनी सांगितले.