शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या धरणांतून पूर्ण क्षमतेने विसर्ग

By admin | Updated: November 5, 2015 02:59 IST

सर्वोच्च न्यायालयाने जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा केल्यामुळे जिल्ह्यातील गंगापूर व दारणा धरण समूहातून पूर्ण क्षमतेने पाणी सोडले जात असून, बुधवार

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाने जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा केल्यामुळे जिल्ह्यातील गंगापूर व दारणा धरण समूहातून पूर्ण क्षमतेने पाणी सोडले जात असून, बुधवार सकाळपर्यंत १,४२७ दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीकडे रवाना झाले आहे. पाटबंधारे खात्याने कोणत्या धरणातून किती पाणी सोडायचे, याचे नियोजन केल्यामुळे १५ दिवसांत टप्पाटप्प्याने पाणी सोडले जाणार आहे.नदीकाठच्या गावांमधील वीजपुरवठा खंडित करणे, पाणी चोरण्याच्या प्रकारांना आळा घालण्याबाबतच्या सूचना वीज व पोलीस खात्याला देण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी सांगितले.गंगापूर धरणातून पाच दिवस तीन हजार क्युसेस व सात दिवस दोन हजार क्युसेस पाणी सोडण्यात येणार आहे. दारणा समूहातूनही तीन, पाच व पंधरा दिवसांपर्यंत जायकवाडीसाठी पाणी सोडले जाणार आहे. गंगापूर धरण समूहातील कश्यपी धरणातून पाणी सोडण्यास स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी नकार देत, आंदोलन सुरू केल्यामुळे तूर्त गंगापूर व गौतमी गोदावरी या दोन धरणांतून पाणी सोडले जात आहे. कश्यपी धरणात ९४५ दशलक्ष घनफूट इतके पाणी आहे. जिल्हा प्रशासनाने जायकवाडीसाठी पाणी सोडण्याबाबतचा आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला असून, पाटबंधारे खात्याला पाण्याची गळती रोखण्याबाबत बजावले आहे. गोदाकाठच्या गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)बैठकीवर लोकप्रतिनिधींचा बहिष्कारधरणांतून पाणी सोडण्यात येणार असल्याने, त्याची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी बोलविलेल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या बैठकीवर सर्वपक्षीयांनी बहिष्कार टाकला, तसेच पाणीप्रश्नी लोकप्रतिनिधींच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्याची विनंती केली. गंगापूर व दारणा धरणातून पाणी सोडल्यास शेतकऱ्यांचे सुमारे १,५०० कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचे आ. निर्मला गावित यांनी सांगितले. महापौर अशोक मुर्तडक यांनी सध्या वीस टक्के पाणीकपात करण्यात आली असून, दहा महिन्यांत एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची वेळ येईल, अशी भीती व्यक्त केली. मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडवताना नाशिकला मराठवाडा करू नका, असेही मुर्तडक म्हणाले.