शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या उपाध्यक्षपदी नाशिकचे संजय खांदारे चर्चेत

By admin | Updated: May 15, 2014 23:32 IST

गेल्या दोन महिन्यांपासून एसटी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपद रिक्त असून या पदांवर अजूनही शासनाकडून नेमणूक करण्यात आलेली नाही.

मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून एसटी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपद रिक्त असून या पदांवर अजूनही शासनाकडून नेमणूक करण्यात आलेली नाही. पण, या पदांसाठी नाशिकच्या पालिका आयुक्तपदी राहिलेले संजय खंदारे, एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त गोपाळ रेड्डी यांची नावे चर्चेत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. एसटीच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी साडेतीन वर्षे राहिलेले दीपक कपूर यांची २०१३ च्या सप्टेंबर महिन्यात अन्न व नागरी पुरवठा विभागात सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर एसटीच्या या पदावर विकास खारगे यांची नेमणूक करण्यात आली. मात्र, खारगे यांनी सप्टेंबर २०१३ ते ७ मार्च २०१४ पर्यंत एसटीच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून जबाबदारी घेतली. त्यानंतर, दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटूनही या पदावर अन्य कुणाचीही नियुक्त झालेली नाही. जर निवडणुकीपूर्वी खारगे यांची सचिवपदी नियुक्ती होऊ शकते, तर एसटीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदच रिक्त का ठेवण्यात आले, असा सवाल उपस्थित होत आहे. या पदाचा तात्पुरता कार्यभार सध्या राज्याचे परिवहन आयुक्त व्ही.एन. मोरे यांच्याकडे आहे. उपाध्यक्षपदासाठी चर्चेतील खंदारे यांनी निवडणुकीची आचारसंहिता लागली असताना काही निर्णय घेतले आणि त्यांची अंमलबजावणी केली. नियमबाह्य पद्धतीने त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे निवडणूक आयोगाकडे आलेल्या तक्रारीनंतर त्यांची उचलबांगडी करण्यात आली आणि या पदावर प्रभारी आयुक्त नेमण्यात आला. सध्या खंदारे यांच्याकडे एकही पद नाही. त्यामुळे त्यांना एसटीच्या उपाध्यक्षपदी नेमण्याचा विचार केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, स्वत: खंदारे हे पुन्हा नाशिक महापालिका आयुक्तपदी येण्यास इच्छुक असल्याचे समजते. त्याचबरोबर एमएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्तपदी असलेले गोपाळ रेड्डी यांचेही नाव उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे सांगण्यात आले. परंतु, रेड्डी यांची १३ फेब्रुवारीला एमएमआरडीए आयुक्तपदी नियुक्ती झाली. त्यामुळे अवघ्या दोन महिन्यांतच त्यांची या पदावरून एसटी उपाध्यक्षपदावर नियुक्ती होणे अशक्य असल्याचे एमएमआरडीएतील सूत्रांकडून सांगण्यात आले. ..................................................कपूर यांचे नावही स्पर्धेत?दीपक कपूर यांनी जवळपास साडेतीन वर्षे एसटीच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार सांभाळला आहे. कपूर यांनाच जास्त अनुभव असून त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक निर्णयही घेतले आहेत. त्यामुळे कपूर यांच्या नावाची चर्चाही सुरूू आहे.