शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक - गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर बाजारपेठ सजली

By admin | Updated: August 27, 2016 19:04 IST

बाजीराव गणपती, लालबागचा राजा, टिटवाळ्याचा गणपती, संत ज्ञानेश्वरांच्या रूपातील गणपती अशा विविध रूपातील गणपती मूर्ती शहरातील बाजार पेठेत दाखल झाली आहेत

- ऑनलाइन लोकमत
बाजीराव गणपती , डायमंड वर्क के लेले गणपतीचे आकर्षण
नाशिक, दि. 27 - बाजीराव गणपती, लालबागचा राजा, टिटवाळ्याचा गणपती, पुणेरी पगडीतील गणपती, बाल गणेश, ज्ञानेश्वरी लिहितांना संत ज्ञानेश्वरांच्या रूपातील गणपती अशा विविध रूपातील गणपती मूर्ती शहरातील बाजार पेठेत दाखल झाली आहेत. शहरातील मेनरोड, कॉलेजरोड, द्वारका, सिडको परिसरात ठिकठिकाणी गणपतीमूर्ती विकणारे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. यावर्षी बाजीराव-मस्तानी चित्रपटातील बाजीराव रूपातील गणपतीमूर्तीला विशेष मागणी असल्याचे चित्र बाजारपेठेत पहायला मिळते.
गणपती बाप्पांचे आगमन अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपले असून, शहरात गेल्या महिनाभरापासून गणेशमूर्ती विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. नाशिकच्या बाजारपेठेत स्थानिक कारखान्यांसह पेण, अहमदनगर आदि भागांतून गणेशमूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. शहरातील गणेश भक्तांनी आतापासूनच आपल्या आवडीची गणेशमूर्ती आरक्षित करण्यास सुरुवात केली आहे. नाशिक शहारातील ग्राहकांप्रमाणेच घोटी, इगतपुरी, जळगाव आदि भागांतून गणेशभक्तांनी गणपतीमूर्ती खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी केली आहे. यावर्षी नेहमीच्या मूर्तीपेक्षा ‘डायमंड वर्क’ केलेल्या मूर्तीलादेखील गणेशभक्तांकडून विशेष मागणी होऊ लागली आहे. विविध रंगांतील खडे, बाजूबंद, मुकुट, सोंडपट्टी आदि आभूषणांची आकर्षक सजावट गणेशमूर्तीवर करण्यात आली आहे.
घरगुती गणपती मूर्तीसह सार्वजनिक मंडळासाठी लागणाऱ्या मोठ्या आकारातील गणेशमूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. रेखीव डोळे, मूर्तीवरील इतर कोरीव काम असलेल्या मूर्ती घेण्याकडे गणेशभक्तांचा विशेष कल दिसून येतो. गणपतीमूर्तीप्रमाणे सजावटीचे साहित्यांची दुकाने सजली आहेत. थर्माेकोलचे मखर, विविध फुले - वेली, इंद्रधनुष्य, चंद्र, लामणदिवा असे विविध प्रकार थर्माेकोल सजावटीचे साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहे. (प्रतिनिधी)
 
डायमंड वर्कच्या मुर्ती खरेदीकडे कल
गणेशोत्सव अवघ्या एका आठवड्यावर येऊन ठेपला असून, विविध प्रकारांतील आकर्षक गणेशमूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. डायमंड वर्क केलेल्या गणेशमूर्ती आमचे वेगळेपण आहे आणि अशा वर्क केलेल्या गणेशमूर्तींना मोठी मागणी आहे.
 
सहा इंच ते सात फूट अशा आकारातील मूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षीही गणेशमूर्तीच्या किमतीमध्ये फारसा फरक नाही. नाशिकप्रमाणेच अमेरिका, हाँगकाँग, फ्रान्स याठिकाणीही गणेशमूर्ती पाठवण्यात आल्या आहेत.
- किरण येवले, गणेशमूर्ती विक्रेता, सुलाई माता कला केंद्र, फावडे लेन