शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

नरेंद्र मोदींची हिटलरशाही - शिवसेनेच्या महापौर स्नेहल आंबेकर

By admin | Updated: July 20, 2015 19:03 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींची शासनपद्धती मला हिटलरशाहीसारखं वाटते, असे वक्तव्य मुंबईच्या महापौर व शिवसेना नेत्या स्नेहल आंबेकर यांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - पंतप्रधान नरेंद्र मोदींची शासनपद्धती मला हिटलरशाही असल्यासारखं वाटते, असे वक्तव्य मुंबईच्या महापौर आणि शिवसेना नेत्या स्नेहल आंबेकर यांनी केले आहे. 
'दि आफ्टरनून' या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या  एका मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. भाजपा व मित्रपक्ष शिवसेना यांच्यात अनेक दिवसांपासून खटके उडत असतानाच शिवसेनेच्या नेत्या असलेल्या स्नेहल आंबेकर यांनी पंतप्रधान मोदींची तुलना थेट जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरशी केल्याने आता नवा वाद उभा राहण्याची चिन्हे आहेत.
'नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने काम करतात त्याचा मी एक व्यक्ती म्हणून आदर करते, स्वत:च्या क्षमतेवर त्यांना प्रचंड विश्वास आहे. मात्र कधीकधी त्यांचे शासन मला हिटलरशाहीसारखं वाटतं. जेव्हा एकाच व्यक्तीच्या हातात सर्व सत्ता एकवटली जाते तेव्हा असं होणं स्वाभाविकच आहे'  असेही आंबेकर यांनी म्हटले आहे. 
राज्यात सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपा- शिवसेनामध्ये सतत काही ना काही कुरबूरी सुरूच आहेत. मग तो नाईट लाईफचा वाद असे किंवा मग पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी केलेली टीका असो, भाजपा व शिवसेनेतील वाद थांबण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. सर्वात कमी वयाच्या पहिल्या महापौर असलेल्या आंबकेर या अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यातच  त्यांच्या या वादग्रस्त विधानाने दोन्ही पक्षातील वाद आणखी उफाळण्याची शक्यता आहे.