शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचाराबाबत नरेंद्र मोदी फक्त भाषणबाजी करत आहेत - अण्णा हजारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2017 03:46 IST

लोकपाल व लोकायुक्ताच्या नेमणुकीबाबत केंद्र सरकार वेळकाढूपणा करत आहे़

पारनेर : लोकपाल व लोकायुक्ताच्या नेमणुकीबाबत केंद्र सरकार वेळकाढूपणा करत आहे़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भ्रष्टाचाराविरोधात फक्त भाषणबाजी करतात, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोदी यांच्यावर तोफ डागली. जनलोकपालच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा दिल्लीत रामलीला मैदानावर लढा उभारण्याचा इशारा त्यांनी बुधवारी दिला़ लोकपाल नेमण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयात अनेकांनी जनहित याचिका दाखल केल्या आहेत़ त्यावरील सुनावणीत देशाचे महाधिवक्ता मुकुंद रोहोतगी यांनी विरोधी पक्षनेतेपद केंद्रात नसल्याने लोकपालची नेमणूक करता येणार नसल्याचे म्हटले आहे़ या पार्श्वभूमीवर हजारेयांनी राळेगणसिध्दीत पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर जोरदार टीका केली़ २०११ मध्ये आंदोलन केल्यावर संसदेत चर्चा होऊन मनमोहन सिंग यांच्या सरकारने जनलोकपाल विधेयक मंजूर केले़ त्यानंतर मोदी सरकारला आपण तीन वर्षात सुमारे तीस ते चाळीस वेळा पत्रव्यवहार करून लोकपाल नेमणूक व कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयाने १८ आॅगस्ट २०१३ रोजी व मागील महिन्यात आपणाला पत्र पाठविले असून त्यात राज्य सरकारला लोकायुक्त नेमण्यास सांगितल्याचे म्हटले आहे. (प्रतिनिधी)