शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

नारायण राणे पुन्हा आक्रमक

By admin | Updated: July 21, 2014 02:52 IST

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काही बदल होणे अपेक्षित होते; मात्र ते झाले नाहीत. हेच नेतृत्व कायम राहिले

कणकवली : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काही बदल होणे अपेक्षित होते; मात्र ते झाले नाहीत. हेच नेतृत्व कायम राहिले तर विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसचा असाच पराभव होईल. त्यामुळेच आपली नाराजी प्रकट करण्यासाठी आपण मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सांगितले. आता इथून पुढे मात्र नेहमीच्या आक्रमक स्वभावानुसार वागणार आहोत, असे सांगत, विरोधक बेताल झाल्याने आता प्रत्येकाला जशास तसे उत्तर देणार, असा इशाराही त्यांनी दिला.राणे सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. तत्पूर्वी कोकणातील लोकांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी कोकणचा दौरा केला. या दौऱ्याचा समारोप रविवारी कार्यकर्त्यांच्या स्नेह मेळाव्याने कणकवलीत झाला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांबाबत स्पष्टपणे उत्तरे दिली.महाराष्ट्रातील नेतृत्वाबाबत आपण नाराजी व्यक्त केली असली तरी मुख्यमंत्र्यांशी आपले वैर नाही. ते आपले मित्र आहेत; पण प्रश्न पक्षाचा आहे. याच नेतृत्वाखाली काँग्रेस विधानसभा निवडणुकांना सामोरी गेली तर लोकसभेसारखाच दारुण पराभव होईल. या पराभवाची जबाबदारी आपल्यावर येऊ नये, यासाठीच आपण राजीनामा देत आहोत, असे ते म्हणााले.पक्षाच्या हायकमांडने तुमचा विश्वासघात केला का? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, आपण विश्वासघात असा शब्द कधीच वापरलेला नाही. २००५ मध्ये आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्या वेळी आपल्याला सहा महिन्यांत मुख्यमंत्री बनविण्याचा शब्द देण्यात आला होता. हा शब्द पाळण्यात आलेला नाही, एवढेच आपले म्हणणे आहे.आपला आक्रमक स्वभाव आणि काँग्रेस कल्चर यात फरक आहे. गेली नऊ वर्षे आपण आपल्या स्वभावाला बगल देत काँग्रेस कल्चर स्वीकारलेच आहे. गेली दोन वर्षे आपण कोणाच्याही टीकेला प्रत्युत्तर दिलेले नाही; मात्र आता विरोधक बेताल झाले आहेत. त्यांची तोंडे सुटली आहेत. त्यामुळेच आपण उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. यापुढे प्रत्येकाला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. या वेळी राणे यांच्यासमवेत संदेश पारकर, विकास सावंत उपस्थित होते. (प्रतिनिधी)