शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास जन्मठेप

By admin | Updated: October 27, 2016 18:49 IST

त:च्या अल्पवयीन मुलीवर सतत दीड वर्ष बलात्कार करणाऱ्या सिंदखेडराजा तालुक्यातील पोफळ शिवणी येथील प्रकाश धनसिंग चव्हाणला मेहकर जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरूवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

ऑनलाइन लोकमतमेहकर (बुलडाणा), दि. २७  :  स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर सतत दीड वर्ष बलात्कार करणाऱ्या सिंदखेडराजा तालुक्यातील पोफळ शिवणी येथील प्रकाश धनसिंग चव्हाणला मेहकर जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरूवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच तिघांना दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. सिंदखेडराजा तालुक्यातील पोफळ शिवणी येथील एका अल्पवयीन मुलीवर तिचे वडील प्रकाश धनसिंग चव्हाण आणि काका सुभाष चव्हाण यांनी सतत दीड वर्ष शारिरीक अत्याचार केला. त्यामुळे ती गर्भवती झाली. ही बाब  लक्षात आल्यावर आई पारूबाई चव्हाण हिने मुलीला मलकापूर पांग्रा येथील डॉ.तृप्ती दांभेरेयांच्याकडे नेवून गर्भपात केला. सदर घटना डघडकीस येवू नये म्हणून सदर मुलीचे बायगाव बु. येथील संजय उत्तम राठोड याचेशी लग्न लावून दिले.

दरम्यान सदर पिडीत मुलीने साखरखेर्डा पोलिस स्टेशनला तक्रार दिल्यावरून आरोपी प्रकाश चव्हाण, सुभाष पांडू चव्हाण, याचेवर भादवी कलम ३७६, ५०६,३४, ३१५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस तपासात डॉ. तृप्ती दाभेरे यांच्या विरूध्द वैद्यकीय गर्भलींग कायदा १९७१चे क३ व ४ नुसार तसेच प्रकाश धनसिंग चव्हाण, पारूबाई चव्हाण, संजय राठोड, उत्तम राठोड, जमुना राठोड, अनिल चव्हाण यांच्या विरूध्द बाल विवाह कायदा २००६ चे क ९,१०,११ नुसार पुरावा उपलब्ध झाल्याने तत्काली पीएसआय शेलार यांनी न्यायालयात दोषारोप दाखल केले होते.

सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. विनोद तायडे यांनी एकून २२ साक्षीदार तपासले सदर प्रकरणात आरोपी प्रकाश चव्हाण यांच्यावर भादवी ३७६ नुसार दोष सिध्द झाल्याने अ‍ॅड, विनोद तायडे यांनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी तसेच स्वत:चे मुलीचे वय कमी असताना तिचे लग्न लावून दिल्यामुळे आरोपी प्रकाश चव्हाण, पारूबाई चव्हाण व संजय राठोड यांना शिक्षा द्यावी असा युक्तवाद केला. विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधिश अ.शा. कलोती यांनी दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून आरोपी प्रकाश चव्हाणला जन्मठेपेची शिक्षा व दोन हजार रूपये दंड तर बाल विवाह कायद्याने ५ हजार रूपये दंड व दोन वर्षाची शिक्षा ठोठवली. पारूबाई प्रकाश चव्हाण हिला ५०० रूपये दंड, संजय राठोड याला एक हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. विनोद तायडे यांनी काम पाहीले