शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्याचा डासमुक्तीचा संकल्प

By admin | Updated: August 16, 2015 00:15 IST

सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्याने उद्भवणाऱ्या साथींच्या आजारांना आळा घालण्यासाठी नांदेडच्या जिल्हा परिषदेने संपूर्ण जिल्हाच गटारमुक्त पर्यायाने डासमुक्त करण्याचा संकल्प केला आहे़

- अनुराग पोवळे, नांदेडसांडपाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्याने उद्भवणाऱ्या साथींच्या आजारांना आळा घालण्यासाठी नांदेडच्या जिल्हा परिषदेने संपूर्ण जिल्हाच गटारमुक्त पर्यायाने डासमुक्त करण्याचा संकल्प केला आहे़ या संकल्पाला मूर्त स्वरूप येत असून, जिल्ह्यातील २०० गावे सप्टेंबरपर्यंत डासमुक्त होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे़ग्रामीण भागात सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा न केल्यामुळे रस्त्यावर पाणी साचून नाल्या तुंबतात़ नाली व डबके यामध्ये पाणी साचल्यामुळे डासांची उत्पत्ती होते़ त्याचवेळी याच सांडपाण्यातून पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्याही असतात़ त्या कुठे फुटल्यास त्याद्वारेही साथरोगांचा प्रादुर्भाव होतो़ यात हिवताप डेंगी, चिकनगुनिया आदी आजार फैलावतात़ हत्तीरोग, जपानी मेंदूज्वर या आजारांचाही डासांद्वारेच प्रसार होतो़ या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी जिल्हा परिषदेने उपाययोजना हाती घेतल्या आहेत़ त्यात कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या स्वरूपाची डास उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात येत आहेत़ जिल्ह्यातील १ हजार ५१३ गावांमध्ये गटारमुक्त अभियान सुरू करण्यात आले आहे़ ४ लाख ८८ हजार २३० कुटुंबांसाठी ३ लाख ६३ हजार १०८ शोषखड्डे उभारण्याचे काम २५ फेब्रुवारी २०१५पासून सुरू झाले आहे़ या उपक्रमात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागालाही सहभागी करून घेण्यात आले आहेत़ मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात ६३ प्रा़ आरोग्य केंद्र आणि ३३४ उपकेंद्र असलेल्या गावांची निवड करण्यात आली आहे़ शोषखड्डे निर्माण करून गटारमुक्तीसाठी जिल्हास्तरावर एक कक्षही स्थापन करण्यात आला़ डिसेंबर २०१५पर्यंत १०० टक्के घरांमध्ये शोष खड्डे तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे़ शासनाच्या मनरेगा योजनेतून २ हजार १११ रुपये प्रति शोषखड्ड्यासाठी अनुदानही दिले जात आहे़ जिल्हा परिषदेच्या पंचायत विभाग आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त वतीने ही मोहीम राबविली जात आहे़ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ बालाजी शिंदे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ़ दुर्गादास रोडे, विस्तार अधिकारी ए़जी़ कावळे, एस़एल़ यल्टीवार आदी परिश्रम घेत आहेत़जिल्ह्यात या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे़ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील २०० गावे डासमुक्त होतील, असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केला आहे़ंअधिकाऱ्यांचा गावातच मुक्कामया मोहिमेच्या जनजागृतीसाठी आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना जनजागृतीसाठी गाव दत्तक देण्यात आले आहे़ त्याचवेळी जिल्हा परिषदेचे खातेप्रमुख, गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांना गावामध्ये दर मंगळवारी मुक्कामी पाठवून गटारमुक्ती व डासमुक्ती मोहिमेची तसेच जिल्हा परिषदेच्या इतर योजनांची माहिती, जनजागृती केली जात आहे़ शोषखड्ड्यांसाठी मनरेगातून निधीगटारमुक्तीच्या या अभियानात जिल्हा परिषदेने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचीही मदत घेतली आहे़ मनरेगातून ८ हजार शोष खड्ड्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे़ त्यातील २ हजार २२४ कामे पूर्णही झाली आहेत़ उर्वरित कामेही प्रगतिपथावर आहेत़ सर्वाधिक १ हजार शोषखड्ड्यांचे काम अर्धापूर तालुक्यात पूर्ण झाले आहे़ तर नायगाव तालुक्यात ५८५ आणि भोकर तालुक्यातील २७५ कामांचा समावेश आहे़